चेन्नई, 21 एप्रिल: या आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) ज्या खेळाडूकडून पंजाब किंग्जला मोठ्या अपेक्षा होत्या तोच के.एल. राहुलची (KL Rahul) सर्वात मोठी डोकेदुखी ठरतोय. वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन निकोलस पूरन (Nicholas Pooran) या सिझनमध्ये 4 पैकी 3 मॅचमध्ये शून्यावर आऊट झाला आहे. पंजाब किंग्जच्या प्रमुख बॅट्समनमध्ये पूरनचा समावेश होतो. त्याला 4.2 कोटी रुपये मोजून पंजाबनं खरेदी केलं होतं.
निकोलस पूरन राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध पहिल्याच बॉलवर आऊट झाला होता. त्याला ख्रिस मॉरीसनं (Chris Morris) आऊट केलं. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध तो 2 बॉल मैदानावर टिकला. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध तिसऱ्या मॅचमध्ये त्यानं पहिला रन काढला. दिल्लीविरुद्धही त्याला कमाल करता आली नाही. तो दिल्ली विरुद्ध फक्त 8 रन काढून आऊट झाला. या खराब कामगिरीमुळे पूरन सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
Nicholas Pooran three ducks for #PBKS in #IPL2021 0 (1 ball) v #RR 0 (2 ball) v #CSK 0 (without facing a ball!) v #SRH#PBKSvSRH#SRHvPBKS#IPL
— Mohandas Menon (@mohanstatsman) April 21, 2021
Nicholas Pooran woke up feeling dangerous
Scored 0 runs Can't even run properly 45yo Gayle is fitter than him 3rd duck in 4 games More intent than runs this season Best T20 talent ?? Better than Ishan Kishan ?? — aivy (@SpiderPant) April 21, 2021
सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये पूरननं निराशा केली. हैदराबाद विरुद्ध तर एकही बॉल न खेळता रन आऊट झाला. डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) थेट थ्रो करत त्याला रन आऊट केलं. या स्पर्धेतील 4 मॅचमध्ये पूरननं फक्त 9 रन केले आहेत. पूरनचा खराब फॉर्म हे देखील पंजाबच्या निराशाजनक कामगिरीचं एक मुख्य कारण आहे.
मैदानात उतरताच राहुलचा मोठा विक्रम! विराट, रोहितला टाकलं मागं
T20 क्रिकेटमध्ये शतक
निकोलस पूरननं त्याच्या आजवरच्या टी 20 कारकिर्दीमध्ये 154 इनिंगमध्ये 24 च्या सरासरीनं 3154 रन केले आहेत. यामध्ये एक शतक आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे. वेस्ट इंडिजकडून खेळताना पूरननं 24 इनिंगमध्ये दोन अर्धशतकांसह 392 रन केले आहेत. त्यानं वन-डे मध्येही एक शतक झळकावलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Kl rahul, Punjab kings, Sunrisers hyderabad