मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: मैदानात उतरताच राहुलचा मोठा विक्रम! विराट, रोहितला टाकलं मागं

IPL 2021: मैदानात उतरताच राहुलचा मोठा विक्रम! विराट, रोहितला टाकलं मागं

पंजाब किंग्जनं (Punjab Kings) सन रायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 121 रनचं आव्हान ठेवलं आहे. चेन्नईतील मॅचमध्ये पंजाबच्या बॅट्समन्सनं निराशा केली. मात्र त्यांचा कॅप्टन के.एल. राहुलनं (KL Rahul) या मॅचमध्ये एक मोठा रेकॉर्ड केला आहे.

चेन्नई, 21 एप्रिल: पंजाब किंग्जनं (Punjab Kings) सन रायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 121 रनचं आव्हान ठेवलं आहे. चेन्नईतील मॅचमध्ये पंजाबच्या बॅट्समन्सनं निराशा केली. त्यांची टीम 19.4 ओव्हर्समध्येच 120 रनवर आऊट झाली. पंजाबच्या एकाही बॅट्समनला मोठा स्कोर करण्यात अपयश आलं. मात्र त्यांचा कॅप्टन के.एल. राहुलनं (KL Rahul) या मॅचमध्ये एक मोठा रेकॉर्ड केला आहे.

राहुलनं टी20 क्रिकेटमध्ये पाच हजार रन्सचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यानं ही कामगिरी 143 इनिंगमध्ये पूर्ण केली आहे. तो सर्वात जलद 5 हजार रन करणारा भारतीय बॅट्समन बनला असून विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या दोन दिग्गजांना राहुलनं मागं टाकलं आहे.

राहुलला हा टप्पा गाठण्यासाठी फक्त 1 रनची आवश्यकता होती. त्यानं तो टप्पा मैदानात उतरल्यावर लगेच पूर्ण केला. रोहितनं 143 इनिंगमध्ये 5003 रन केले असून यामध्ये त्याची सरासरी 42 तर स्ट्राईक रेट 138 आहे. रोहितनं टी 20 क्रिकेटमध्ये 4 शतक आणि 41 अर्धशतक झळकावली आहेत. राहुलनं 4 पैकी 2 शतक आंतरराष्ट्रीय टी 20 मॅचमध्ये झळकावली आहेत.

टी20 क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी

इंग्लंड विरुद्ध झालेल्या 5 मॅचच्या टी 20 मालिकेत रा्हुल फ्लॉप ठरला होता. त्याला 4 मॅचनंतर शेवटच्या मॅचसाठी  वगळण्यात आले होते. तरीही राहुलची टी20 क्रिकेटमधील कामगिरी जोरादार आहे. 45 आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये राहुलनं 40 च्या सरासरीनं 1557 रन केले आहेत. यामध्ये 2 शतक आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. टेस्ट, वन-डे आणि टी 20 या क्रिकेटच्या तीन्ही प्रकार शतक झळकावणाऱ्या भारताच्या मोजक्या खेळाडूंमध्ये राहुलचा समावेश आहे.

पंजाबची बॅटींग पुन्हा फेल, हैदराबादच्या जाळ्यात अडकले दिग्गज!

ख्रिस गेल अव्वल

टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 5 हजार रन करण्याचा रेकॉर्ड राहुलचा पंजाब टीममधील सहकारी ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलनं 132 इनिंगमध्ये ही कामगिरी केली आहे. राहुलनं ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शला मागं टाकलं असून तो आता या यादीत गेलनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीनं 167 तर रोहित शर्मानं 188 इनिंगमध्ये 5 हजार रन पूर्ण केले. याचाच अर्थ राहुलनं विराटपेक्षा 24 आणि रोहितपेक्षा 45 कमी इनिंगमध्ये 5 हजार रनचा टप्पा ओलांडला आहे.

First published:
top videos

    Tags: IPL 2021, Kl rahul, Punjab kings, Rohit sharma, Virat kohli