Home /News /sport /

IPL 2021: 0,0,0,0 चार कोटींचा बॅट्समन चौथ्यांदा शून्यावर आऊट, राहुलची डोकेदुखी कायम

IPL 2021: 0,0,0,0 चार कोटींचा बॅट्समन चौथ्यांदा शून्यावर आऊट, राहुलची डोकेदुखी कायम

पंजाब किंग्जच्या (PBKS) निकोलस पूरनची (Nicholas Pooran) या आयपीएलमधील (IPL 2021) निराशाजनक कामगिरी सुरुच आहे. पूरन या सिझनमध्ये सपेशल फ्लॉप ठरला असून सातपैकी 4 मॅचमध्ये शून्यावर आऊट झाला आहे.

    अहमदाबाद, 30 एप्रिल : पंजाब किंग्जच्या (PBKS) निकोलस पूरनची  (Nicholas Pooran) या आयपीएलमधील (IPL 2021) निराशाजनक कामगिरी सुरुच आहे. मागच्या आयपीएलमध्ये 25 सिक्स लगावणारा पूरन या सिझनमध्ये सपेशल फ्लॉप ठरला असून सातपैकी 4 मॅचमध्ये शून्यावर आऊट झालाय. त्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा संधी देणाऱ्या के.एल. राहुलची (KL Rahul) डोकेदुखी वाढली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्धच्या मॅचमध्ये पूरन चौथ्यांदा शून्यावर आऊट झाला. पूरन मैदानावर आला तेंव्हा पंजाबची परिस्थिती चांगली होती. पूरनचा वेस्ट इंडिजमधील ज्येष्ठ सहकारी ख्रिस गेलनं (Chris Gayle) फक्त 24 बॉलमध्ये 4 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं 46 रन काढले होते. गेल आऊट झाल्यानंतर पूरनकडून पंजाबला मोठ्या अपेक्षा होत्या. पण तो पुन्हा शून्यावर आऊट झाला. काइल जेमिसनच्या बॉलिंगवर शाहबाज अहमदनं त्याचा कॅच पकडला यापूर्वी निकोलस पूरन राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध पहिल्याच बॉलवर आऊट झाला होता. त्याला ख्रिस मॉरीसनं (Chris Morris) आऊट केलं. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध तो 2 बॉल मैदानावर टिकला. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध तिसऱ्या मॅचमध्ये त्यानं पहिला रन काढला. दिल्लीविरुद्धही त्याला कमाल करता आली नाही. तो दिल्ली विरुद्ध फक्त 8 रन काढून आऊट झाला. मोठी बातमी! ... तर T20 वर्ल्ड कप 'या' देशात होणार, BCCI ची घोषणा सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये पूरननं निराशा केली. हैदराबाद विरुद्ध तर एकही बॉल न खेळता रन आऊट झाला. डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) थेट थ्रो करत त्याला रन आऊट केलं.  निकोलस पूरननं या आयपीएलमध्ये 7 मॅचमध्ये 4.66 च्या सरासरीनं 28 रन काढले असून 19 हा त्याचा सर्वोच्च स्कोअर आहे. सतत संधी देऊनही शून्यच्या चक्रात अडकलेल्या पूरनला पुढच्या मॅचमध्ये राहुल वगळण्याची शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, Kl rahul, Punjab kings, RCB

    पुढील बातम्या