• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 वर्ल्ड कपसाठी निवड समितीचं दुर्लक्ष, भारतीय बॅट्समननं दिलं चोख उत्तर

T20 वर्ल्ड कपसाठी निवड समितीचं दुर्लक्ष, भारतीय बॅट्समननं दिलं चोख उत्तर

राजस्थान विरुद्ध पंजाबचा (RR vs PBKS) पराभव झाला असला तरी पंजाबच्या एका खेळाडूनं दमदार खेळ करत आपण फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे. त्याचबरोबर त्यानं निवड समितीलाही बॅटनं उत्तर दिलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 सप्टेंबर : आयपीएल 2021 (IPL 2021) स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला आता सुरूवात झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा 2 मे रोजी 29 मॅचनंतर स्थगित करावी लागली होती. आता स्पर्धेतील उर्वरित मॅच यूएईमध्ये (IPL 2021 Phase 2) होत आहेत. उर्वरित 31 पैकी 3 मॅच आत्तापर्यंत झाल्या आहेत. मंगळवारी झालेल्या थरारक लढतीमध्ये राजस्थान रॉयल्सनं पंजाब किंग्जचा (Rajasthan Royals vs Punjab Kings) 2 रननं पराभव केला. राजस्थान विरुद्ध पंजाबचा पराभव झाला असला तरी पंजाबच्या एका बॅट्समननं दमदार खेळ करत आपण फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे. पंजाबच्या मयांक अग्रवालनं (Mayank Agarwal) या मॅचमध्ये दमदार खेळ करत त्याचे टिकाकार आणि टी20 वर्ल्ड कपसाठी दुर्लक्ष करणाऱ्या निवड समितीला बॅटनं चोख उत्तर दिलं आहे. दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये (Dubai International Stadium) झालेल्या पंजाब विरुद्ध राजस्थान (PBKS vs RR) मॅचमध्ये मयांकनं दमदार अर्धशतक झळकावलं. त्यानं 43 बॉलमध्ये 67 रन काढले. या खेळीत त्यानं 2 सिक्स आणि 7 फोर लगावले. त्याचबरोबर त्यानं कॅप्टन केएल राहुलसोबत (KL Rahul) 120 रनची पार्टनरशिप केली. T20 World Cup : सगळ्यात मोठा सामना भारताविरुद्ध नाही, तर... शोएब अख्तरची या टीमला 'धमकी' निवड समितीला उत्तर मयांकनं ही खेळी करत टी20 वर्ल्ड कपसाठी त्याच्याकडं दुर्लक्ष करणाऱ्या निवड समितीला उत्तर दिलं आहे. या वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय टीममध्ये (Team India) मयांकचा समावेश करण्यात आलेला नाही. निवड समितीनं मयांकपेक्षा रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना पसंती दिली आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कप हा यूएईमध्येच होणार आहे. साखळी फेरीतील टीम इंडियाच्या 5 पैकी 4 मॅच दुबईत होणार आहेत. त्याच दुबईच्या मैदानात मयांकनं अर्धशतक झळकावलं. IPL 2021 : फिटनेससाठी रोज 30 मिनीटं धावत स्टेशनवर जायचा, आता आयपीएलमध्ये पदार्पण! मयांकची खेळी व्यर्थ मयांक अग्रवालच्या या दमदार खेळीनंतर पंजाब किंग्जचा पराभव झाला. पंजाबला 15 बॉलमध्ये 10, 12 बॉलमध्ये 8 आणि अखेरच्या ओव्हरमध्ये फक्त 4 रन हवे होते, पण कार्तिक त्यागीने (Kartik Tyagi) शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 1 रन दिली आणि 2 विकेट घेतल्या.
  POINTS TABLE: पंजाबविरुद्धच्या या विजयासह राजस्थानची टीम पॉईंट्स टेबलमध्ये (IPL Points Table) पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. राजस्थानने 8 पैकी 4 मॅच जिंकल्या आणि 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. तर दुसरीकडे पंजाबची टीम सातव्या क्रमांकावर आहे. पंजाबने 9 पैकी 6 सामने गमावले असून 3 मध्ये त्यांचा विजय झाला. राजस्थानच्या खात्यात आता 8 तर पंजाबच्या खात्यात 6 पॉईंट्स आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: