Home /News /sport /

IPL 2021: पंजाबच्या धक्कादायक पराभवानंतर कॅप्टन राहुल नाराज, टीमच्या कामगिरीवर म्हणाला...

IPL 2021: पंजाबच्या धक्कादायक पराभवानंतर कॅप्टन राहुल नाराज, टीमच्या कामगिरीवर म्हणाला...

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध 19 ओव्हर मॅचवर वर्चस्व गाजवल्यानंतर पंजाबचा शेवटच्या ओव्हरमध्ये धक्कादायक पराभव झाला. या पराभवानंतर पंजाबचा कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) चांगलाच निराश झाला आहे.

    मुंबई, 22 सप्टेंबर : पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Punjab Kings vs Rajasthan Royals) यांच्यात मंगळवारी रात्री झालेल्या मॅचमध्ये पंजाबचा 2 रननं निसटता पराभव झाला. 19 ओव्हर मॅचवर वर्चस्व गाजवल्यानंतर पंजाबचा शेवटच्या ओव्हरमध्ये धक्कादायक पराभव झाला. या पराभवानंतर पंजाबचा कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) चांगलाच निराश झाला आहे. आम्हाला दबावात चांगला खेळ करणे आवश्यक होते.  हा पराभव पचवणे अवघड आहे. कारण, आम्ही मागील चुकांमधून धडा शिकलेलो नाही. आम्ही पहिल्या 6 ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली होती पण दुर्दैवानं बॉल बॅटला लागल्यानंतर फिल्डर्सच्या हातामध्ये आला नाही. आम्ही शेवटच्या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक केलं होतं.' असं राहुलनं सांगितलं. ORANGE CAP: राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबचा (Punjab Kings vs Rajasthan Royals) 2 रनने पराभव झाला आहे. राजस्थानने ठेवलेल्या 186 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात धडाक्यात झाली. केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) या दोघांनी पंजाबला शतकी ओपनिंग पार्टनरशीप करून दिली. पंजाबला 15 बॉलमध्ये 10,आणि शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 4 रन हवे होते, पण कार्तिक त्यागीने (Kartik Tyagi) शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 1 रन दिली आणि 2 विकेट घेतल्या. IPL 2021: 6 बॉलमध्ये बदललं मॅचचं चित्र, कार्तिकच्या ओव्हरमध्ये दिग्गज झाले निरुत्तर राजस्थानच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबच्या सुरुवातीच्या चारही बॅट्समनना चांगली सुरुवात मिळाली होती. मयंक अग्रवालने 43 बॉलमध्ये सर्वाधिक 67 रन केले होते. तर केएल राहुलने 49, एडन मार्करमने नाबाद 26, निकोलस पूरनने 32 रन केले, तरीही पंजाबला पराभवाचा धक्का बसला. राजस्थानकडून कार्तिक त्यागीला 2 विकेट मिळाल्या, तर चेतन सकारिया आणि राहुल तेवतिया यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, Kl rahul, Punjab kings, Rajasthan Royals

    पुढील बातम्या