IPL 2021: शाहरुखच्या टीम विरुद्ध पुणेकर हिरो! धोनीचा विश्वास ठरवला सार्थ

IPL 2021: शाहरुखच्या टीम विरुद्ध पुणेकर हिरो! धोनीचा विश्वास ठरवला सार्थ

चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीममधील पुणेकर शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) टीमविरुद्ध हिरो ठरला आहे. सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला पुन्हा संधी दिली.

  • Share this:

मुंबई, 21 एप्रिल: चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीममधील पुणेकर शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) टीमविरुद्ध हिरो ठरला आहे. मुंबईतील मॅचमध्ये ऋतुराज गायकवाड (Rutruraj Gaikwad) याने आक्रमक 64 धावांची खेळी केली . गायकवाड या आयपीएलमधील तीन मॅचमध्ये अपयशी ठरला होता. त्याला तीन मॅचमध्ये मिळून फक्त 20 रन करता आले होते. तरीही सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) याने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि पुन्हा संधी दिली. ऋतुराजनं तो विश्वास सार्थ ठरवला.

मुंबईतील सामन्यात टॉस हरल्यानंतर चेन्नईची टीम पहिल्यांदा बॅटींगसाठी उतरली. ऋतुराजनं अनुभवी फाफ ड्यू प्लेसिस (Faf  du Plessis) बरोबर चेन्नईला आक्रमक सुरुवात करुन दिली. या दोघांमध्ये ऋतुराज अधिक आक्रमक होता. त्यानं 33 बॉलमध्येच 5 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं या सिझनमधील पहिलं अर्धशतक पूर्ण केलं. अर्धशतकानंतरही ऋतुराजचा धडाका कायम होता. तो अखेर 42 बॉलमध्ये 64 रन काढून आऊट झाला. वरुण चक्रवर्तीनं (Varun Chakravarthy) त्याला आऊट केलं.

तीन मॅचमध्ये अपयशी

ऋतुराजसाठी या आयपीएलची सुरुवात चांगली झाली नव्हती. त्यानं पहिल्या 3 मॅचमध्ये फक्त 6.67 च्या सरासरीनं 20 रन केले होते. त्यामुळे त्याच्यावर मोठी टीका झाली होती. ऋतुराजच्या जागी अनुभवी रॉबीन उथप्पाचा (Robin Uthappa) समावेश करण्यात यावा अशी मागणी होत होती. त्यानंतरही सीएसके मॅनेजमेंटचा ऋतुराजला भक्कम पाठिंबा होता.

फिल्डर गायब झाल्यावर धोनी वैतागला, स्टम्प माईकमध्ये कैद झाला 'आवाज'

"रॉबीन उथप्पा वेटींगमध्ये आहे. पण ऋतुराज गायकवाडचा मागील सिझनमधील खेळ लक्षात घेऊन त्याला आणखी संधी मिळणार आहे. तुम्हाला आमची फिलॉसॉफी माहिती आहे. आम्ही खेळाडूला तो जे करु पाहतोय ते करण्यासाठी पुरेसा वेळ देतो. सध्या तरी आम्ही त्याच्या पाठिशी आहोत." असं या मॅचपूर्वीच सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगनं सांगितलं होतं.

Published by: News18 Desk
First published: April 21, 2021, 9:00 PM IST

ताज्या बातम्या