अहमदाबाद, 29 एप्रिल: दिल्ली कॅपिटल्सचा बॅट्समन पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यानं कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध (KKR) आक्रमक सुरुवात केली आहे. पृथ्वीनं शिवम मावीच्या (Shivam Mavi) एकाच ओव्हरमध्ये सलग 6 फोर लगावले. आयपीएल स्पर्धेत एकाच ओव्हरमध्ये 6 फोर लगावणारा पृथ्वी हा दुसरा बॅट्समन आहे. या आयपीएलमधील पहिल्याच ओव्हरमध्ये 6 फोर लगावत पृथ्वीनं इतिहास रचला आहे.
पृथ्वी शॉ चा दिल्ली कॅपिटल्स टीममधील सहकारी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यानं 2013 साली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध ही कामगिरी (RCB) केली होती. त्यावेळी रहाणे राजस्थान रॉयल्स (RR) टीमचा सदस्य होता. रहाणेनं श्रीनाथ अरविंदच्या ओव्हरमध्ये हा विक्रम केला होता.
Wd4⃣4⃣4⃣4⃣4⃣4⃣
DC Admin doesn't have any adjectives or puns left #YehHaiNayiDilli #IPL2021 #DCvKKR — Delhi Capitals (Stay Home. Wear Double Masks) (@DelhiCapitals) April 29, 2021
#DCStatAttack Prithvi Shaw becomes the second batsman after Ajinkya Rahane to score six fours in an over in the IPL #YehHaiNayiDilli #IPL2021 #DCvKKR
— Delhi Capitals (Stay Home. Wear Double Masks) (@DelhiCapitals) April 29, 2021
पृथ्वी शॉनं त्याचं अर्धशतक अवघ्या 18 बॉलमध्ये 9 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं पूर्ण केलं. हे या आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक आहे. त्यानं दीपक हुडाचा (Deepak Hooda) 20 बॉलमध्ये अर्धशतक झळकावण्याचा विक्रम मोडला. दीपकनं राजस्थान रॉयल्स विरुद्ध ही कामगिरी केली होती.
यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सनं पहिल्यांदा बॅटींग करताना निर्धारीत 20 ओव्हरमध्ये 6 आऊट 154 रन काढले. केकेआरकडून आंद्रे रसेलनं सर्वात जास्त नाबाद 45 रन काढले. तर शूभमन गिलनं 43 रन काढले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Prithvi Shaw