Home /News /sport /

IPL 2021: धोनीमुळे झाला CSK चा पराभव? वाचा काय आहेत कारणं...

IPL 2021: धोनीमुळे झाला CSK चा पराभव? वाचा काय आहेत कारणं...

चेन्नईचा पहिल्याच मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) सात विकेट्सनं पराभव केला. कॅप्टन महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चुकांचा फटका चेन्नईला पहिल्या मॅचमध्ये बसला.

    मुंबई, 11 एप्रिल : गेल्या सिझनमधील (IPL 2020) अपयश झटकून नव्या जोमानं सुरुवात करण्याच्या उद्देशानं महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीम शनिवारी उतरली होती. चेन्नईचा पहिल्याच मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) सात विकेट्सनं पराभव केला. अशी टीका केली जात आहे की, कॅप्टन महेंद्रसिंह धोनीच्या चुकांचा फटका चेन्नईला पहिल्या मॅचमध्ये बसला. बॅटींग ऑर्डरमधील बदल महेंद्र सिंह धोनीनं या मॅचमध्ये काही आश्चर्यकारक बदल केले.  मॅचमध्ये वेगानं रन बनवण्याची गरज होती तेंव्हा धोनी हा जडेजाच्या (Ravindra Jadeja) आधी सहाव्या क्रमांकावर बॅटींगला आला. धोनीला मागील आयपीएलनंतर स्पर्धात्मक क्रिकेटचा सराव नाही. तसंच त्याला आयपीएलमध्येही (IPL 2020) फार कमाल करता आली नव्हती. या उलट रवींद्र जडेजानं मागील आयपीएलमध्ये तसंच ऑस्ट्रेलिया सीरिजमध्ये चांगला खेळ केला आहे. शनिवारी देखील त्यानं 17 बॉलध्ये 26 रन काढले पण ते पुरेसे ठरले नाहीत. तर धोनी शून्यावर आऊट झाला. त्याला आवेश खाननं आऊट केलं. याआधी 6 वर्षांपूर्वी 2015 साली मुंबई इंडियन्सविरुद्ध धोनी पहिल्याच बॉलला माघारी परतला होता. तर 2010 साली तो राजस्थान आणि दिल्लीविरुद्धच शून्य रनवर आऊट झाला होता. धोनीनं तिसऱ्या नंबरवर मोईन अलीला (Moeen Ali) बॅटींगला पाठवल्याबद्दलही आश्चर्य व्यक्त होत आहे. करण, चेन्नईच्या टीममध्ये तिसऱ्या नबंरची जागा सुरेश रैनाची (Suresh Raina) आहे. याच क्रमांकावर त्यानं सर्वात जास्त रन काढले आहेत. धोनीनं काय दिलं कारण? पहिल्या मॅचमधील पराभवानंतर बॉलर्सनी धडा घ्यायला हवा, असं मत धोनीनं व्यक्त केलं आहे. "बॉलर्सनी अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन केलं नाही. त्यांनी खराब बॉलिंग केली. या पराभवानंतर त्यांनी धडा घेतला आहे. आता ते पुढील मॅचमध्ये चांगली कामगिरी करतील," असं धोनीनं सांगितलं. (हे वाचा : IPL 2021 : धोनी शून्य रनवर आऊट होताच रोहित शर्मा ट्रोलर्सच्या निशाण्यावर ) "ड्यूवर बरंच काही अवलंबून आहे, ही गोष्ट लक्षात ठेवून आम्ही जास्त रन करायला हवे होते,'' हे देखील धोनीनं मान्य केलं. चेन्नईची पुढील मॅच 16 एप्रिल रोजी पंजाब किंग्स विरुद्ध होणार आहे.
    First published:

    Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni

    पुढील बातम्या