Home /News /sport /

IPL 2021, Points Table: पंजाबच्या विजयाचा मुंबईला फटका, पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल

IPL 2021, Points Table: पंजाबच्या विजयाचा मुंबईला फटका, पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल

आयपीएल स्पर्धेत शनिवारी झालेल्या डबल हेडरनंतर पॉईंट टेबलमध्ये (IPL 2021, Points Table) मोठा बदल झाला आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) याचा मोठा फटका बसला आहे.

    मुंबई, 26 सप्टेंबर : आयपीएल स्पर्धेत शनिवारी पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या डबल हेडरच्या मॅच झाल्या. या मॅचनंतर पॉईंट्स टेबलमध्ये (IPL 2021 Points Table) मोठा बदल झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सची (DC) टीम पुन्हा नंबर वन झाली आहे. पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) या डबल हेडरचा मोठा फटका बसला आहे. शनिवारी रात्री झालेल्या मॅचमध्ये पंजाब किंग्जनं सनरायझर्स हैदराबादचा (PBKS vs SRH) 5 रननं पराभव केला. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सची (MI) टीम टॉप 5 मधून बाहेर पडली आहे. पंजाबनं या विजयानंतर 'प्ले ऑफ' साठीचं आव्हान कायम ठेवलं आहे. त्यांचे आता 10 मॅचनंतर 4 विजय आणि 6 पराभवासह 8 पॉईंट्स झाले आहेत.  मुंबईचे देखील 9 मॅचनंतर 4 विजय आणि 5 पराभवासह 8 पॉईंट्स आहेत. पण पंजाबची सरासरी मुंबईपेक्षा चांगली असल्यानं ती टीम पाचव्या तर मुंबईची टीम सहाव्या नंबरवर आहे. IPL 2021: अर्जून तेंडुलकरच्या रुमवर अनोखा ‘छापा’, लॉकरमधील सामानाचा VIDEO होतोय VIRAL दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्सचा पराभव करत पॉईंट टेबलमध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे. दिल्लीचे 10 मॅचमध्ये 8 विजयासह 16 पॉईंट्स झाले आहेत. त्यामुळे त्यांची 'प्ले ऑफ' मधील जागा नक्की झाली आहे. चेन्नई सुपर किंग्सची टीम (CSK) 9 मॅचमध्ये 7 विजय आणि 4 पराभवासह 14 पॉईंट्सची कमाई करत दुसऱ्या क्रमांकावर आहे. POINTS TABLE: यूएई लीगमध्ये झालेल्या दोन पराभवानंतरही  विराट कोहलीची (Virat Kohli) आरसीबी (RCB) 10 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सनं सलग दोन विजय मिळवत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, Mumbai Indians, Punjab kings

    पुढील बातम्या