मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : CSK Play off मध्ये, उर्वरित 3 जागांसाठी 6 टीमना करावा लागेल 'हा' अडथळा पार

IPL 2021 : CSK Play off मध्ये, उर्वरित 3 जागांसाठी 6 टीमना करावा लागेल 'हा' अडथळा पार

आयपीएल 2021 मधील (IPL 2021)  12 लीग मॅच आता शिल्लक आहेत. ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आलेली असताना आता आयपीएल 'प्ले ऑफ' चं (IPL 2021 Playoff) चित्रं स्पष्ट होत आहे.

आयपीएल 2021 मधील (IPL 2021) 12 लीग मॅच आता शिल्लक आहेत. ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आलेली असताना आता आयपीएल 'प्ले ऑफ' चं (IPL 2021 Playoff) चित्रं स्पष्ट होत आहे.

आयपीएल 2021 मधील (IPL 2021) 12 लीग मॅच आता शिल्लक आहेत. ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आलेली असताना आता आयपीएल 'प्ले ऑफ' चं (IPL 2021 Playoff) चित्रं स्पष्ट होत आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 1 ऑक्टोबर : आयपीएल 2021 मधील (IPL 2021)  12 लीग मॅच आता शिल्लक आहेत. ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आलेली असताना आता आयपीएल 'प्ले ऑफ' चं (IPL 2021 Playoff) चित्रं स्पष्ट होत आहे. चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादचा (SRH) पराभव केला आहे. त्यानंतर चेन्नई 'प्ले ऑफ'मध्ये दाखल झालेली पहिली टीम बनली आहे. तर हैदराबादचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. आता उर्वरित 3 जागांसाठी 6 टीममध्ये संघर्ष आहे.

दिल्ली कॅपिटल्स (DC), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB), कोलकाता नाईट रायडर्स (KKR), राजस्थान रॉयल्स (RR), मुंबई इंडियन्स (MI) आणि पंजाब किंग्ज (PBKS) या टीममध्ये चुरस आहे. या सर्व टीमच्या 11 मॅच झाल्या असून आणखी 3 मॅच बाकी आहेत.  या प्रत्येक टीमची सध्या काय परिस्थिती आहे, पाहूया

दिल्ली कॅपिटल्स : दिल्लीची टीम पॉईंट टेबलमध्ये सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी 11 पैकी 8 मॅच जिंकल्या असून त्यांचे सध्या 16 पॉईंट्स आहेत. दिल्लीच्या अजून ती मॅच बाकी आहेत. त्यामुळे त्यांचे जास्तीत जास्त 22 पॉईंट्स होतील. यापैकी एक मॅच जिंकली तरी प्ले ऑफ मधील त्यांचा प्रवेश नक्की होणार आहे.

IPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं शब्द पाळला! हैदराबादवरील विजयानंतर म्हणाला...

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबीनं 11 पैकी 7 मॅच जिंकल्या असून ही टीम पॉईंट टेबलमध्ये सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता उर्वरित 3 पैकी 2 मॅच त्यांनी जिंकल्या तर ही टीम 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश करेल.

कोलकाता नाईट रायडर्स : केकेआरनं 11 पैकी 5 मॅच जिंकल्या असून ते 10 पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहेत. मुंबईचेही तितकेच पॉईंट्स आहेत. पण कोलकाताचा रनरेट मुंबईपेक्षा चांगला आहे. केकेआरनं उर्वरित 3 पैकी 2 मॅच चांगल्या रन-रेटनं जिंकल्या तर त्यांची 'प्ले ऑफ' मधील दावेदारी नक्की होईल.

KKR vs PBKS, Dream 11 Prediction : 'हे' 11 खेळाडू बदलतील तुमचं नशीब

मुंबई इंडियन्स : गतविजेत्या मुंबईसाठी हा आयपीएल सिझन चांगला गेलेला नाही. मुंबई आणि कोलताचे पॉईंट्स समान आहेत. पण मुंबईचा रनरेट हा खराब आहे. त्यामुळे त्यांना आता उर्वरित 3 मॅच चांगल्या फरकानं जिंकणे आवश्यक आहे.

POINTS TABLE:

पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन टीमच्या प्ले ऑफ मध्ये पोहचण्याच्या आशा अंधुक झाल्या आहेत. या दोन्ही टीमनी 11 पैकी 4 मॅचमध्ये विजय तर 7 मध्ये पराभव सहन केला आहे. त्यामुळे त्यांना आता उर्वरित तीन्ही मॅच चांगल्या फरकानं जिंकण्याबरोबरच  इतर समीरणांवरही अवलंबून राहावे लागेल.

First published:

Tags: Cricket news, IPL 2021