IPL 2021: ‘या’ तारखेला होणार खेळाडूंचा लिलाव, वाचा कोणत्या टीमकडं किती आहेत पैसे

IPL 2021: ‘या’ तारखेला होणार खेळाडूंचा लिलाव, वाचा कोणत्या टीमकडं किती आहेत पैसे

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) साठी खेळाडूंच्या लिलावाची तारीख ठरली आहे. या सीझनसाठी खेळाडूंचा लिलाव 18 फेब्रुवारी रोजी चेन्नईत होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 27 जानेवारी:   इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धेपूर्वी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावाची तारीख ठरली आहे. या सीझनसाठी खेळाडूंचा लिलाव 18 फेब्रुवारी रोजी चेन्नईत होणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती दिली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरी टेस्ट मॅच 17 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्यानंतर लगेच 18 तारखेला खेळाडूंचा लिलाव होईल.

या आयपीएलसाठी खेळाडूंना कायम ठेवण्याची मुदत  20 जानेवारी होती. त्यानंतर चार फेब्रुवारीपर्यंत ट्रेडिंग विंडो (एका टीममधून दुसऱ्या टीममध्ये ट्रान्सफर) सुरु असेल. यंदा आयपीएल टीमनं करारमुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये स्टीव्ह स्मिथ (राजस्थान रॉयल्स), ग्लेन मॅक्सवेल (किंग्ज इलेव्हन पंजाब) या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. तर रॉबीन उथप्पाला राजस्थान रॉयल्सकडून चेन्नई सुपर किंग्सनं खरेदी केलं आहे. स्मिथ आणि मॅक्सवेल सारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तगडा अनुभव असलेल्या खेळाडूंवर कोणती टीम बोली लावते याची सर्वांना उत्सुकता आहे.

एका टीममध्ये किती खेळाडू असतील ?

प्रत्येक टीमला जास्तीत जास्त 25 आणि कमीत कमी 18 खेळाडू ठेवण्याची परवानगी आहे. कोणत्याही टीममध्ये जास्तीत जास्त 8 विदेशी खेळाडूंना परवानगी आहे

(हे वाचा-IND vs ENG: टेस्ट सीरिजपूर्वी महेंद्रसिंह धोनीला भेटला ऋषभ पंत, पाहा PHOTO)

दुसरा पर्याय काय?

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) मागील वर्षीच्या आयपीएल स्पर्धेचं आयोजन युएईमध्ये करण्यात आलं होतं. यावर्षी आयोजकांची पहिली पंसती भारताला आहे. तर, दुसरी पसंती युएई आहे. आयपीएल स्पर्धेच्या आयोजनासाठी भारत सरकारनं परवानगी देणं आवश्यक आहे.

कोणत्या टीमकडं किती पैसे?

या लिलावासाठी सर्वात जास्त पैसे किंग्ज इलेव्हन पंजाबकडं (KIXP) तर सर्वात कमी पैसे कोलकाता नाईट रायडर्सकडं (KKR) आहेत. पंजाबकडं एकूण 53.2 कोटी रक्कम शिल्लक आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडं (RCB) 35.70 कोटी, चेन्नई सुपर किंग्स (CSK) 22.90 कोटी, राजस्थान रॉयल्सकडं 35.70 कोटी इतकी रक्कम शिल्लक आहे.

(हे वाचा-IPL 2021: विराटच्या टीमनं सोडलेल्या ‘या’ खेळाडूवर तीन टीम लावणार बोली?)

आयपीएल स्पर्धेचं पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सकडं (MI) 15.35 कोटी रक्कम शिल्लक आहे. दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) कडं प्रत्येकी 12.8 कोटी रक्कम आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सकडं (KKR) सर्वात कमी 10.85 कोटी रक्कम शिल्लक आहे.

Published by: News18 Desk
First published: January 27, 2021, 4:33 PM IST

ताज्या बातम्या