मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: फक्त 1 मॅच खेळूनही केला मोठा रेकॉर्ड, सर्व भारतीयांना टाकलं मागं

IPL 2021: फक्त 1 मॅच खेळूनही केला मोठा रेकॉर्ड, सर्व भारतीयांना टाकलं मागं

मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये मोठा विजय हवा होता. सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये मुंबईनं त्यासाठी जोरदार प्रयत्न केले.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 9 ऑक्टोबर : मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये मोठा विजय हवा होता. सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये मुंबईनं त्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मुंबईनं या महत्त्वाच्या मॅचमध्ये दोन बदल केले होते. सौरभ तिवारीच्या जागी कृणाल पांड्या आणि जयंत यादवच्या जागी पियूष चावला (Piyush Chawala) याचा समावेश केला होता.

2011 च्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचा सदस्य असलेला चावला हा आयपीएल इतिहासातीलही एक यशस्वी बॉलर आहे. मागच्या वर्षी चेन्नई सुपर किंग्सकडून (Chennai Super Kings) खेळणाऱ्या चावलाला यंदा मुंबई इंडियन्सनं खरेदी केलं होतं. संपूर्ण सिझन बेंचवर बसलेल्या चावलानं शेवटच्या मॅचमध्ये मुंबईकडून पदार्पण केले. या एकमेव मॅचमध्येही त्यानं मोठा रेकॉर्ड केला आहे.

चावलाचा मोठा रेकॉर्ड

पियूष चावलानं या मॅचमध्ये एकच विकेट घेतली. त्यानं हैदराबादच्या इनिंगमधील नवव्या ओव्हरमध्ये मोहम्मद नबीला आऊट केलं. त्याचबरोबर तो टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जास्त विकेट घेणारा बॉलर बनला. चावलानं 249 टी20 मॅचमध्ये 263 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं यावेळी अमित मिश्राला (Amit Mishra) मागे टाकलं. मिश्रानं 236 मॅचमध्ये 262 विकेट्स घेतल्या आहेत.

5 वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचं यंदा काय चुकलं? रोहितनं दिलं उत्तर

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीमध्ये चावला चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानं 165 आयपीएल मॅचमध्ये 157 विकेट्स घेतल्या आहेत. तर अमित मिश्रा 157 मॅचमध्ये 166 विकेट्स घेऊन या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हार्दिक पांड्या T20 वर्ल्ड कपमध्ये बॉलिंग करणार का? रोहितनं दिलं मोठं अपडेट

 मुंबईनं शेवटच्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) 42 रननं हरवले. पण हा विजय 'प्ले ऑफ' गाठण्यासाठा पुरेसा ठरला नाही. मुंबईला हैदराबादला 65 पेक्षा कमी रनमध्ये रोखणे आवश्यक होते. पण हैदराबादनं 8 आऊट 193 रन केले. यंदा सलग तिसरे विजेतेपद पटकावण्याच्या निर्धारानं उतरलेल्या मुंबई इंडियन्सचं विजेतेपदाचं स्वप्न यंदा पूर्ण झालं नाही.

First published:

Tags: Cricket news, IPL 2021