मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : महेंद्रसिंह धोनीची CSK कॅम्पमध्ये जोरदार एन्ट्री, VIDEO VIRAL

IPL 2021 : महेंद्रसिंह धोनीची CSK कॅम्पमध्ये जोरदार एन्ट्री, VIDEO VIRAL

चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) चेन्नईत दाखल झाला असून त्याच्या एन्ट्रीचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

चेन्नई, 11 ऑगस्ट : आयपीएल स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे स्थगित करण्यात आला होता. आता या स्पर्धेतील उर्वरित 31 सामने (IPL 2021 Phase 2) यूएईमध्ये होणार असून सप्टेंबर महिन्यात याची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) तयारी सुरू केली आहे. सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीसह (MS Dhoni) टीममधील खेळाडू चेन्नईत दाखल झाले आहेत. धोनीच्या सीएसके कॅम्पमधील एन्ट्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

चेन्नई सुपर किंग्सनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन धोनीच्या एन्ट्रीचा फोटो शेअर केलाय. या फोटोला सिंहाच्या प्रवेशाचा दिवस असं कॅप्शन देण्यात आलं आहे. त्याचबरोबर इन्स्टाग्रामवरील dhonism या महेंद्रसिंह धोनीच्या फॅन अकाऊंटवर धोनीच्या एन्ट्रीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by DHONIsm™ ❤️ (@dhonism)

सीएसकेच्या तयारीत अडथळा

चेन्नई सुपर किंग्सची टीम नियोजित वेळापत्रकानुसार 13 ऑगस्ट रोजी दुबईला रवाना होणार आहे. मात्र यूएई सरकारनं अद्याप या टीमला दुबईत उतरण्याची परवानगी दिलेली नाही. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी याबाबत 'इनसाईड स्पोर्ट्स'ला बोलताना ही माहिती दिली आहे. आम्हाला यूएई सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. ही मंजुरी लवकरच मिळेल आणि आम्ही नियोजित वेळापत्रकानुसार दुबईला रवाना होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

IND vs ENG : लॉर्ड्स टेस्टमध्ये इशांत शर्मा खेळणार की अश्विन ? वाचा संभाव्य Playing 11

बीसीसीआय या प्रकरणात लवकरच तोडगा काढेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. यूएई सरकारची मान्यता वेळेत मिळाली नाही तर सीएकेचे दुबईला जाणे काही दिवस लांबणीवर पडू शकते. दुबईला रवाना होण्यासाठी कॅप्टन धोनीसह सुरेश रैना, रॉबीन उथप्पा,  ऋतुराज गायकवाड आणि कर्ण शर्मासह सीएसकेचे प्रमुख खेळाडू चेन्नईत दाखल झाले आहेत.

First published:

Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni, Video Viral On Social Media