Home /News /sport /

IPL 2021: Playing 11 मध्ये मिळाली नाही संधी, जबरदस्त कॅच घेत जिंकली सर्वांची मनं VIDEO

IPL 2021: Playing 11 मध्ये मिळाली नाही संधी, जबरदस्त कॅच घेत जिंकली सर्वांची मनं VIDEO

सनरायझर्स हैदराबादचं (SRH) या आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) आव्हान संपुष्टात आलं आहे. पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये हैदराबादचा पराभव झाला. पण, हैदराबादच्या एका खेळाडूनं जबरस्त कॅच घेत सर्वांची मनं जिंकली आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 26 सप्टेंबर : आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) शनिवारी झालेल्या मॅचमध्ये पंजाब किंग्जनं सनरायझर्स हैदराबादचा (PBKS vs SRH) 5 रननं पराभव केला. हैदराबादचा हा या स्पर्धेतील आठवा पराभव होता. या पराभवानंतर ही टीम 'प्ले ऑफ' च्या शर्यतीमधून बाहेर पडली आहे. हैदराबादचा पंजाबविरुद्ध निसटता पराभव झाला. पण या टीमचा एक खेळाडू जगदीश सुचितनं (Jagdeesha Suchith Catch) जबरदस्त कॅच घेत सर्वांची मनं जिंकली. जगदीशचा हैदराबादच्या प्लेईंग 11 मध्ये समावेश नव्हता. तो राखीव खेळाडू म्हणून खेळत होता. जगदीशनं या मॅचमध्ये दोन कॅच पकडले. पहिला कॅच पंजाब किंग्जचा कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) आणि दुसरा दीपक हुडाचा (Deepak Hooda) पकडला. यापैकी हुडाच्या कॅचबद्दल त्याची प्रशंसा होत आहे. मॅचमधील 16 व्या ओव्हरमध्ये त्यानं हा कॅच पकडला. सध्या हा कॅच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. IPL 2021: मनिष पांडेनं मैदानात केलं बालिश वर्तन, सगळीकडे होतेय थू-थू या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटींगला आलेल्या पंजाबनं 15 ओव्हरनंतर 95 रन केले होते. दीपक हुडा आणि हरप्रीत बरार ही जोडी मैदानात होती. टीमला सन्मानजनक स्कोअरपर्यंत नेण्याची जबाबदारी या दोघांवर होती. हैदराबादच्या जेसन होल्डरनं 16 वी ओव्हर टाकली. या ओव्हरचा चौथा बॉल दीपक हुडानं कव्हरच्या दिशेनं टोलावला. त्यावेळी तिथं सुचित उभा होता. त्याने हवेत झेपावत एका हातानं हा जबरदस्त कॅच पकडला. हैदराबादचा पराभव हुडा आऊट झाल्यानंतर पंजाबची टीम वेगानं रन बनवू शकली नाही. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 7 आऊट 125 रन केले. हैदराबादच्या टीमला हे माफक टार्गेट पूर्ण करता आले नाही. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या या मॅचमध्ये हैदराबादनं 7 आऊट 120 रन केले. हैदराबादकडून जेसन होल्डरनं एकाकी लढत देत 3 विकेट्स घेतल्या आणि 47 रन काढले.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या