पुढच्या IPL मध्ये आणखी दोन टीम! BCCI बैठकीत होणार अंतिम निर्णय

पुढच्या IPL मध्ये आणखी दोन टीम! BCCI बैठकीत होणार अंतिम निर्णय

पुढच्या वर्षी म्हणजेच आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये आणखी दोन टीमचा समावेश होऊ शकतो. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय (BCCI) च्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या एजेंड्यामध्ये दोन नव्या टीम सामील करण्याचा मुद्दा ठेवण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 3 डिसेंबर : पुढच्या वर्षी म्हणजेच आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये आणखी दोन टीमचा समावेश होऊ शकतो. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय (BCCI) च्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या एजेंड्यामध्ये दोन नव्या टीम सामील करण्याचा मुद्दा ठेवण्यात आला आहे. या बैठकीमध्येच दोन टीमबाबत अंतिम निर्णय होईल. 24 डिसेंबरला मुंबईमध्ये बीसीसीआयची बैठक होणार आहे. या बैठकीत 2028 सालच्या लॉस ऍन्जलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबतही विचार केला जाणार आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल संपल्यापासूनच दोन नव्या टीम आणण्याबाबत चर्चा सुरू आहे. बोर्डाच्या बड्या अधिकाऱ्यांमध्ये दोन नव्या टीम आणण्याबाबत आयपीएल फायनलदरम्यानच अनौपचारिक बैठक झाली होती. या बैठकीला बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि बोर्डाचे सचिव जय शाह उपस्थित होते. या मुद्द्यावरून आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक होणार होती, पण याबाबत औपचारिक चर्चा झालेली नाही, पण आता बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यावर विचार केला जाईल, असं सांगण्यात येत आहे.

रेसमध्ये कोण कोण?

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार अहमदाबाद, लखनऊ आणि पुणे या नावांवर विचार केला जात आहे. अडानी ग्रुप आणि संजीव गोयंका यांची RPSG ग्रुप या दोन टीम विकत घेण्यासाठी आघाडीवर आहेत. याआधी गोयंका दोन वर्षांसाठी पुण्याच्या टीमचे माल होते. दक्षिण भारतातला एक मोठा अभिनेताही आयपीएल टीम विकत घेऊ इच्छितो.

2008 साली आयपीएलची सुरुवात झाली होती, तेव्हा 8 टीम होत्या, पण यानंतर ही संख्या 10 करण्यात आली होती, पण पुन्हा एकदा निर्णय बदलून ही संख्या 8 झाली. आता परत एकदा बीसीसीआय आयपीएल टीम दोनने वाढवण्याचा विचार करत आहे.

Published by: Shreyas
First published: December 3, 2020, 3:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या