IPL मध्ये पुढच्या वर्षी जोडली जाणार या शहराची टीम?

IPL मध्ये पुढच्या वर्षी जोडली जाणार या शहराची टीम?

आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर आता पुढच्या आयपीएल (IPL 2021)च्या तयारीला सुरुवातही झाली आहे. पुढच्या आयपीएलसाठी आणखी एक टीम वाढवण्याचा बीसीसीआय (BCCI) चा विचार आहे.

  • Share this:

मुंबई : आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर आता पुढच्या आयपीएल (IPL 2021)च्या तयारीला सुरुवातही झाली आहे. पुढच्या आयपीएलसाठी आणखी एक टीम वाढवण्याचा बीसीसीआय (BCCI) चा विचार आहे. पुढच्या वर्षीचं आयपीएल मार्च-एप्रिल महिन्यामध्ये सुरू होईल, असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने आधीच सांगितलं होतं. पण आता मोसमाच्या आधी आयपीएलचा मोठा लिलाव होण्याची शक्यता आहे. दैनिक भास्करने याबाबतचं वृत्त दिलं आहे. आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलने याबाबत अजून बैठक घेतलेली नाही, पण याबाबत सध्याच्या फ्रॅन्चायजीशी बोलणी सुरू आहेत.

'वेळेची कमतरता आहे, पण मेगा ऑक्शन सगळ्यांच्याच हिताचा असेल. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल याबाबत औपचारिकरित्या पुढच्या दोन आठवड्यांमध्ये निर्णय घेईल आणि सगळ्यांना याची माहिती देईल,' असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितल्याचं वृत्त दैनिक भास्करने दिलं आहे.

2021 साली मेगा ऑक्शन होणार हे आधीच ठरलं होतं, पण कोरोनामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा लांबली, त्यामुळे फ्रॅन्चायजींकडे वेळही कमी उरला आहे, म्हणून लिलाव रद्द करण्याची मागणी होत होती. आता जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात हा मेगा ऑक्शन होऊ शकतो. तर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएलला सुरुवात होऊ शकते. एका फ्रॅन्चायजीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने त्यांना लिलावाची तयारी करायला सांगितलं आहे. अधिकृतरित्या असं काही सांगण्यात आलं नसलं, तरी आम्ही याच्या तयारीत आहोत, असं फ्रॅन्चायजीशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितलं.

अहमदाबादची नवी टीम?

आयपीएलची नवीन टीम जर आली तर मग एकूण टीमची संख्या 9 होईल. माध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार ही नवी टीम अहमदाबादची असू शकते. काहीच दिवसांपूर्वी अहमदाबादमधल मोटेरा स्टेडियम बांधून तयार झालं आहे. 1.10 लाख प्रेक्षक या स्टेडियममध्ये बसू शकतात. प्रेक्षक संख्येच्या क्षमतेच्या बाबतीत हे जगातलं सगळ्यात मोठं स्टेडियम आहे. याचवर्षी मोटेरा स्टेडियममध्ये मॅच होणार होत्या, पण कोरोनामुळे या स्टेडियममध्ये मॅच झाली नाही.

कसा होणार लिलाव?

2018 साली झालेल्या लिलावामध्ये टीमना तीन खेळाडूंना रिटेन करण्याची आणि दोन खेळाडूंना लिलावात राईट टू मॅच कार्ड वापरून परत टीममध्ये घेण्याचा नियम होता. नवीन टीम आल्यानंतरही हा नियम कायम राहण्याची शक्यता आहे. कारण हा नियम नसेल तर टीमच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूला धक्का लागेल, अशी भीती फ्रॅन्चायजींना वाटत आहे.

Published by: Shreyas
First published: November 15, 2020, 10:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या