Home /News /sport /

IPL 2021: मॅक्सवेलनं संपवला 1079 दिवसांचा दुष्काळ, विराटला बसला धक्का!

IPL 2021: मॅक्सवेलनं संपवला 1079 दिवसांचा दुष्काळ, विराटला बसला धक्का!

ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) फ्लॉप गेला होता. त्याने विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीममध्ये येताच आक्रमक खेळ केला. त्यानं 14 व्या सिझनमध्ये पहिलाच सिक्स स्टेडियमच्या बाहेर 100 मीटर लांब लगावला.

    चेन्नई, 10 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) कडून पहिली मॅच खेळत असलेला ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) शुक्रवारी पूर्ण रंगात होता. मागच्या सिझनमध्ये मॅक्सवेल फ्लॉप गेला होता. त्याने विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीममध्ये येताच आक्रमक खेळ केला. त्यानं 14 व्या सिझनमध्ये पहिलाच सिक्स स्टेडियमच्या बाहेर 100 मीटर लांब लगावला. मॅक्सवेलचा आक्रमक अंदाज पाहून विराटलाही आश्चर्याचा धक्का बसला होता. मुंबई इंडियन्सच्या 160 रनचा पाठलाग करताना  11 व्या ओव्हरमध्ये मॅक्सवेलनं कृणाल पांड्याच्या (Krunal Pandya) बॉलिंगवर  हा मोठा सिक्स लगावला. कृणालनं टाकलेला बॉल त्याने थेट स्टेडियमच्या छतावर टोलावला. त्यानंतर मॅक्सवेलनं राहुल चहरला (Rahul Chahar) स्विच हिटवर सिक्स लगावत पहिल्याच मॅचमध्ये सर्व प्रतिस्पर्धी टीमला धोक्याचा इशारा दिला आहे. मॅक्सवेलनं मुंबई विरुद्ध झालेल्या पहिल्या मॅचमध्ये 2 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं 39 रन काढले. त्याला मार्को जेनसन (Marco Jansen) आऊट केलं. आरसीबीनं मॅक्सवेलला डीव्हिलियर्सच्या आधी चौथ्या नंबरवर बॅटींगला पाठवलं होतं. अखेर दुष्काळ संपला! मॅक्सवेलनं शुक्रवारी आयपीएल  स्पर्धेत तब्बल 1079 दिवसांनी सिक्स लगावला. यापूर्वी त्यानं 27 एप्रिल 2018 रोजी आयपीएलमध्ये शेवटचा सिक्स लगावला होता. त्यानं 2019 च्या आयपीएलमधून माघार घेतली होती. त्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबकडून त्याचा मागील सिझन अत्यंत खराब गेला. मागच्या सिझनमधील 13 मॅचमध्ये 106 बॉलमध्ये फक्त 108 रन काढले होते.  मागील संपूर्ण सिझन त्याला एकही सिक्स लगावता आला नाही. अखेर शुक्रवारी 170 बॉल आणि 18 इनिंगनंतर मॅक्सवेलनं सिक्स लगावला आहे. ( IPL 2021: सतत फ्लॉप होऊनही Maxwell ला इतके पैसे का मिळतात? गंभीरनं सांगितलं कारण ) मुंबईची खराब सुरुवात या वर्षाच्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) मुंबईचा 2 विकेटने पराभव केला आहे. आरसीबीकडून एबी डिव्हिलियर्सने 27 बॉलमध्ये सर्वाधिक 48 रन केले, तर मॅक्सवेलने 39 रनची आणि विराट कोहलीने 33 रनची खेळी केली. मुंबईकडून बुमराह (Jaspirt Bumrah) आणि मार्को जेनसनला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर ट्रेन्ट बोल्ट आणि कृणाल पांड्याला 1 विकेट घेण्यात यश आलं. 2013 पासून लागोपाठ 9 वर्ष मुंबईने आयपीएलचे पहिले सामने गमावले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Glenn maxwell, IPL 2021, Mumbai Indians, RCB, Virat kohli

    पुढील बातम्या