नवी दिल्ली, 29 एप्रिल: आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) 24 व्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सामना राजस्थान रॉयल्सशी (Rajasthan Royals) होत आहे. मुंबईची टीम सलग दोन पराभवानंतर या मॅचमध्ये उतरली आहे. तर राजस्थाननं शेवटच्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) 6 विकेट्सनं पराभव केला होता. त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा राजस्थानचा प्रयत्न असेल.
मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मानं यानं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. मुंबईनं या मॅचमध्ये एक बदल केला असून फॉर्मात नसलेल्या इशान किशनच्या (Ishan Kishan) जागी नॅथन कुल्टर नाईलचा (Nathan Coulter Nile) समावेश केला आहे. तर राजस्थान रॉयल्सनं टीममध्ये एकही बदल केलेला नाही.
मुंबई इंडियन्सकडून कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) यानं या सिझनमध्ये चांगली सुरुवात केली आहे. मात्र त्याला अजून मोठी खेळी करण्यात अपयश आलंय. रोहितचा पार्टरनर क्विंटन डी कॉकसाठी देखील ही स्पर्धा आत्तापर्यंत निराशाजनक ठरली आहे. राजस्थान रॉयल्सलाळे विदेशी खेळाडूंच्यी माघारीमुळे धक्का बसला असून त्यांचीही ओपनिंग जोडी या स्पर्धेत आत्तपर्यंत अपयशी ठरली आहे.
मुंबई इंडियन्सला रोहित शर्मासह सूर्यकुमार यादवकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तर राजस्थानच्या बॅटींगची भिस्त ही कॅप्टन संजू सॅमसन (Sanju Samson) आणि जोस बटलरवर आहे. राजस्थानच्या शिवम दुबे आणि डेव्हिड मिलर यांनीही या स्पर्धेतील काही सामन्यात समाधानकारक खेळ केला आहे. तर मुंबईचे पांड्या बंधू आणि कायरन पोलार्ड हे दिल्लीच्या मैदानात चालले तर मुंबईचा विजय हा निश्चित आहे.
मुंबईच्या बॉलिंगची धुरा ही जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांच्या खांद्यावर आहे. तर राजस्थानच्या बॉलिंगचं नेतृत्व हा आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ख्रिस मॉरीस करणार आहे.
खेळाडूंनंतर अंपायर्सची स्पर्धेतून माघार, Nitin Menon यांची आई-पत्नी कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई इंडियन्सची Playing XI : रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड. कृणाल पांड्या, नॅथन कुल्टर नाईल, जयंत यादव, राहुल चहर, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट
राजस्थान रॉयल्सची Playing XI : जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल तेवातिया, ख्रिस मॉरीस, जयदेव उनाडकत, चेतन सकारिया आणि मुस्तफिजूर रहमान
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, IPL 2021, Mumbai Indians, Rajasthan Royals, Rohit sharma, Sanju samson, Sports