मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: मुंबई इंडियन्स फॉर्मात, राजस्थान रॉयल्सचा केला मोठा पराभव

IPL 2021: मुंबई इंडियन्स फॉर्मात, राजस्थान रॉयल्सचा केला मोठा पराभव

पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणारी मुंबई इंडियन्सची (MI) टीम पुन्हा एकदा विजयाच्या ट्रॅकवर परतली आहे.  मुंबई इंडियन्सनं राजस्थान रॉयल्सचा (RR) 7 विकेट्सनं  पराभव केला.

पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणारी मुंबई इंडियन्सची (MI) टीम पुन्हा एकदा विजयाच्या ट्रॅकवर परतली आहे. मुंबई इंडियन्सनं राजस्थान रॉयल्सचा (RR) 7 विकेट्सनं पराभव केला.

पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणारी मुंबई इंडियन्सची (MI) टीम पुन्हा एकदा विजयाच्या ट्रॅकवर परतली आहे. मुंबई इंडियन्सनं राजस्थान रॉयल्सचा (RR) 7 विकेट्सनं पराभव केला.

नवी दिल्ली, 29 एप्रिल : पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणारी मुंबई इंडियन्सची (MI) टीम पुन्हा एकदा विजयाच्या ट्रॅकवर परतली आहे.  मुंबई इंडियन्सनं राजस्थान रॉयल्सचा (RR) 7 विकेट्सनं  पराभव केला. मागील दोन पराभवानंतर धडा घेत मुंबईच्या बॅट्समननं जबाबदारी खेळ करत हा विजय मिळवला आहे.

मुंबई इंडियन्सचा विकेट किपर - बॅट्सन क्विंटन डी  कॉक (Quinton de Kock)  या विजयाचा  हिरो ठरला. त्यानं मुंबईकडून सर्वात जास्त नाबाद 70 रन काढले. डी कॉकनं या आयपीएलमधील पहिली हाफ सेंच्युरी 35 बॉलमध्ये 5 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं पूर्ण केली. रोहित शर्मा (14) आणि सूर्यकुमार यादव (16) यांना चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही.

रोहित आणि सूर्या आऊट झाल्यानंतर डी कॉकनं कृणाल पांड्या (Krunal Pandya) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 63 रनची पार्टरनरशिप करत मुंबईला विजयाच्या मार्गावर नेलं. कृणाल 39 रन काढून आऊट झाला. मुंबई इंडियन्सचा या स्पर्धेतील हा तिसरा विजय आहे. तर राजस्थान रॉयल्सचा चौथा पराभव आहे.

IPL 2021 : टीम इंडियाच्या स्टारला मुंबईनं वगळलं! 47 दिवसांमध्ये बदलली परिस्थिती

यापूर्वी राजस्थान रॉयल्सनं पहिल्यांदा बॅटींग करत निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 आऊट 171 रन काढले. राजस्थानकडून संजू सॅमसननं (Sanju Samson) सर्वात जास्त 42 रन काढले. तर जोस बटलरनं 41 रनची खेळी केली. यशस्वी जैस्वाल (32) आणि शिवम दुबे (35) यांनी उपयुक्त खेळी केल्यानं राजस्थानला मुंबईसमोर 172 रनचं आव्हान ठेवता आलं. मुंबईकडून राहुल चहरनं सर्वात जास्त 2 विकेट्स घेतल्या. तर बोल्ट आणि बुमराहला प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मानं यानं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. मुंबईनं या मॅचमध्ये एक बदल केला. या सिझनमध्ये फॉर्मात नसलेल्या इशान किशनच्या (Ishan Kishan)  जागी नॅथन कुल्टर नाईलला (Nathan Coulter Nile) अंतिम 11 मध्ये संधी दिली. तर राजस्थान रॉयल्सनं टीममध्ये कोणताही बदल केला नव्हता.

First published:

Tags: IPL 2021, Mumbai Indians, Rajasthan Royals