• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021, MI vs DC : 'करो वा मरो' लढतीत रोहितनं काढलं ट्रम्प कार्ड, दिल्लीसाठी आहे डोकेदुखी

IPL 2021, MI vs DC : 'करो वा मरो' लढतीत रोहितनं काढलं ट्रम्प कार्ड, दिल्लीसाठी आहे डोकेदुखी

मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) आता प्रत्येक मॅच 'करो वा मरो' स्वरुपातील आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या (MI vs DC) मॅचमध्ये मुंबई इंडियन्सनं एक बदल केला आहे.

 • Share this:
  शारजाह, 2 ऑक्टोबर : मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) या आयपीएलमधील दोन दिग्गज टीममधील मॅच सुरू झाली आहे. यूएईमध्ये सलग तीन मॅच गमावल्यानंतर मुंबईनं पंजाब किंग्जचा पराभव केला आहे. पराभवाची साखळी तोडलेल्या मुंबई इंडियन्ससाठी आता प्रत्येक मॅच 'करो वा मरो' स्वरुपातील आहे. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सनं एक बदल केला आहे. मुंबई इंडियन्सची शारजामध्ये ही पहिलीच मॅच आहे. या मॅचमध्ये दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंत (Ridhabh Pant) यानं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. टॉस नंतर रोहितनं मुंबईच्या टीमची माहिती दिली. पंजाब किंग्जचा (PBKS) पराभव केलेल्या टीममध्ये मुंबईनं एक बदल केला आहे. T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात निवड झालेला लेग स्पिनर राहुल चहरच्या (Rhaul Chahar) च्या जागी मुंबईचा दिल्ली कॅपिटल्स स्पेशालिस्ट जयंत यादवचा (Jayant Yadav) समावेश करण्यात आला आहे. दिल्ली विरुद्ध ट्रम्प कार्ड जयंत यादवनं मागच्या तीन आयपीएल सिझनमध्ये 7 मॅच खेळल्या असून यामध्ये चार वेळा तो दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळला आहे. त्यापैकी तीन मॅचमध्ये त्यानं 25 रन देऊन 1 विकेट अशी कामगिरी केली आहे. तर एका मॅचमध्ये तीन ओव्हर्समध्ये 18 रन देऊन त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. दिल्लीच्या टॉप 5 मध्ये 3 डावखुरे बॅट्समन असल्यानं मुंबई इंडियन्स नेहमीच जयंत यादवला संधी दिली आहे. दिल्लीच्या या डावखुऱ्या बॅटरविरुद्ध जयंतचा रेकॉर्ड चांगला आहे. शिखर धवन, ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांना रोखण्यात जयंत नेहमीच यशस्वी ठरला आहे. त्याचबरोबर पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यरविरुद्धही त्याचा मारा प्रभावी ठरला आहे. IPL 2021, MI vs DC : मुंबई इंडियन्सबाबत सेहवागचं मत वाचून रोहित शर्मा होईल नाराज!! जयंतच्या याच खासियतमुळे मागच्या वर्षी झालेली आयपीएल फायनल (IPL 2020 Final) तसंच यावर्षी चेन्नईत झालेल्या मॅचमध्येही मुंबईनं त्याला खेळवलं होतं. त्याचबरोबर जयंत हा राहुल चहरच्या तुलनेत चांगला बॅटर आहे. मुंबई इंडियन्सची मिडल ऑर्डर यंदा फॉर्मात नाहीय. त्यामुळे लोअर ऑर्डरमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये जयंतची बॅटींग मुंबईसाठी उपयुक्त ठरु शकते. IPL 2021, RR vs CSK : महेंद्रसिंह धोनी राजस्थान रॉयल्सविरुद्ध करणार 'द्विशतक'! मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड कृणाल पांड्या, कुल्टर नाईल, जयंत यादव, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट दिल्ली कॅपिटल्स :  पृथ्वी शॉ, शिखर धवन,  श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिमरन हेटमायर, स्टीव्ह स्मिथ, अक्षर पटेल, आर. अश्विन, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया, आवेश खान
  Published by:News18 Desk
  First published: