नवी दिल्ली, 1 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) यांच्यात शनिवारी मॅच होणार आहे. आयपीएल इतिहासातील दोन बलाढ्य टीममधील या लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलंय. या मॅचपूर्वी चेन्नईनं सलग 5 विजय मिळवलेत. तर मुंबईनं दोन पराभवानंतर राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध विजय मिळवलाय. पॉईंट टेबलमध्ये चेन्नईची टीम पहिल्या क्रमांकावर असून मुंबईची टीम चौथ्या क्रमांकावर आहे.
चेन्नईची टीम सध्या फॉर्मात असली तरी त्यांना मुंबई विरुद्ध सावध राहावं लागणार आहे. याचं मुख्य कारण म्हणजे दोन्ही टीमच्या अलिकडील लढतींमध्ये मुंबईचं पारडं जड आहे. त्याचबरोबर मुंबईनं राजस्थान विरुद्धच्या मॅचमध्ये सफाईदार विजय मिळवत धोनीच्या टीमला इशारा दिलाय. मुंबई इंडियन्सचा बॅट्समन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने याबाबत पहिल्यांदाच संकेत दिले होते.
मुंबई इंडियन्सनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन सूर्यकुमार यादवच्या जुन्या वक्तव्याची आठवण करुन दिली आहे. 'मुंबई इंडियन्सची टीम मीडल ऑर्डरमधील समस्या सोडवण्यापासून फक्त एक मॅच दूर आहे,' असा दावा सूर्यकुमारनं पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध 9 विकेट्सनं मॅच हरल्यानंतर केला होता.
. . #OneFamily #MumbaiIndians #MI #IPL2021 #MIvRR @surya_14kumar pic.twitter.com/VSWYBdV27l
— Mumbai Indians (@mipaltan) April 30, 2021
IPL 2021: कोहली, मॅक्सवेल आणि डीव्हिलियर्सला आऊट करणारा हरप्रीत कोण आहे?
सूर्यकुमारचं हे भाकित मुंबईनं राजस्थानविरुद्ध खरं केलं. राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट्सनं पराभव केला. राजस्थाननं दिलेलं 172 रनचं टार्गेट पूर्ण करताना मुंबईकडून क्विंटन डी कॉकनं नाबाद 70 रनची खेळी केली होती. त्याला कृणाल पांड्यानं 39 रन काढत चांगली साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 63 रनची पार्टरनरशिप केली. त्यानंतर कायरन पोलार्डनंही 8 बॉलमध्ये नाबाद 16 रन काढत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. सूर्यकुमारचा शब्द मुंबईनं खरा केला. त्याची आठवण मुंबई इंडियन्सनं या ट्विटमध्ये करुन दिली आहे. त्यामुळे फॉर्मात आलेल्या मुंबई इंडियन्सला रोखण्यासाठी चेन्नईच्या टीमला त्यांची कामगिरी उंचवावी लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Csk, IPL 2021, Mumbai Indians, Suryakumar yadav