मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: धोनीला हरवल्यानंतर पोलार्डचा इतर टीमना गंभीर इशारा, म्हणाला...

IPL 2021: धोनीला हरवल्यानंतर पोलार्डचा इतर टीमना गंभीर इशारा, म्हणाला...

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) या शेवटपर्यंत रंगलेल्या मॅचमध्ये मुंबईचा कायरन पोलार्ड (Kieron Pollard) अखेर सर्वांवर भारी पडला. या मॅचनंतर पोलार्डनं इतर टीमना गंभीर इशारा दिला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 2 मे: मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) या शेवटपर्यंत रंगलेल्या मॅचमध्ये मुंबईचा कायरन पोलार्ड (Kieron Pollard) अखेर सर्वांवर भारी पडला. या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं मुंबईसमोर 219 रनचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना 10 ओव्हरमध्ये पोलार्ड बॅटींगला आला. त्यावेळी मुंबईची अवस्था 3 आऊट 81 होती. पोलार्डनं मैदानात उतरताच मॅचची सर्व सूत्र हाती घेतली. त्यानं फक्त 17 बॉलमध्ये 3 फोर आणि 6 सिक्सच्या मदतीनं अर्धशतक झळकावलं. या आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याचा विक्रमक त्यानं मोडला. पृथ्वीनं कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध 18 बॉलमध्ये अर्धशतक झळकावले होते. अर्धशतकानंतरही पोलार्ड थांबला नाही. त्यानं 34 बॉलमध्ये नाबाद 87 रनची खेळी केली, यामध्ये त्याने 6 फोर आणि 8 सिक्स मारले. तब्बल 255.88 च्या स्ट्राईक रेटने पोलार्डने बॅटिंग केली. तो अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देऊनच ड्रेसिंग रुममध्ये परतला. पोलार्डचं या विजयानंतर ड्रेसिंगरुममध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. पोलार्डही यामुळे चांगलाच खूश झाला होता. त्यानं सहकाऱ्यांची गळाभेट घेत विजयाचा आनंद साजरा केला. या सर्व प्रसांगाचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सनं त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला आहे. चेन्नई विरुद्धच्या ऐतिहासिक खेळीनंतर पोलार्डनं सर्व आयपीएल टीमना एक गंभीर इशारा दिलाय. "आम्हाला कमी समजू नका. आम्ही हे पूर्वी केलं आहे आणि यापुढेही करु कुणी काहीही म्हंटल तरी...'' या शब्दात पोलार्डनं सर्व टीमना इशारा दिला आहे. IPL 2021: 8 वर्षांमध्ये पहिल्यांदाच डेव्हिड वॉर्नरवर 'ही' नामुश्की का आली? पोलार्डची आयपीएल कारकीर्द कायरन पोलार्ड हा 2010 पासून मुंबई इंडियन्सचा सदस्य आहे. त्यानं 171 आयपीएल मॅचमध्ये 150.87 च्या स्ट्राईक रेटनं 3191 रन काढले आहेत. यामध्ये 16 अर्धशतकांचा समावेश असून नाबाद 87 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याचबरोबर पोलार्डनं 8.83 च्या इकॉनॉमी रेटनं 63 विकेट्स घेतल्या आहेत. नियमित कॅप्टन रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये टीमच्या नेतृत्त्वाची धुरा देखील पोलार्डनं सांभाळली आहे.
First published:

Tags: Csk, IPL 2021, Kieron pollard, Mumbai Indians

पुढील बातम्या