• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: मुंबईवरील विजयानंतर धोनी खूश, 'या' 2 खेळाडूंना दिलं श्रेय

IPL 2021: मुंबईवरील विजयानंतर धोनी खूश, 'या' 2 खेळाडूंना दिलं श्रेय

चेन्नई सुपर किंग्सनं मुंबई इंडियन्सचा (CSK vs MI) 20 रननं पराभव केला. या विजयानंतर चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) चांगलाच खूश झाला आहे. त्यानं या विजयाचं श्रेय दोघांना दिलं आहे.

 • Share this:
  दुबई, 20 सप्टेंबर : ओपनिंग बॅट्समन ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) यांच्या दमदार खेळावर चेन्नई सुपर किंग्सनं मुंबई इंडियन्सचा (CSK vs MI) 20 रननं पराभव केला. या विजयानंतर चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) चांगलाच खूश झाला आहे. त्यानं या विजयाचं श्रेय या दोघांना दिलं आहे. रविवारी झालेल्या मॅचमध्ये (Mumbai Indians vs Chennai Super Kings) मुंबईसमोर विजयासाठी 157 रनचं लक्ष्य होतं. पण चेन्नईच्या भेदक बॉलिंगमुळे मुंबईला निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 आऊट 136 रन करता आले. चेन्नईकडून ब्राव्होनं 3 तर दीपक चहरनं 2 विकेट्स घेतल्या. मुंबईकडून सौरभ तिवारी (40 बॉलमध्ये नाबाद 50) या एकमेव बॅट्समननं 20 पेक्षा जास्त रन केले. IPL 2021, MI vs CSK : डिकॉकने केली मोठी चूक, मुंबईला पडली महागात! धोनीनं मॅचनंतर बोलताना सांगितलं की, '30 रनमध्येच 4 विकेट्स गमावल्यानंतर सन्मानजनक स्कोअर करण्याचा आमचा प्रयत्न होता. ऋतुराज आणि ब्राव्होनं आमच्या अपेक्षापेक्षा चांगला खेळ केला. आम्ही 140 च्या जवळ जाण्याचा विचार केला होता. पण 160 च्या जवळ गेलो. विकेटवर असमान बॉल येत होते. लोअर ऑर्डरच्या बॅट्समनसाठी रन काढणे अवघड होते. रायडू जखमी झाल्यानं रन तिथं पुनरागमन करणे अवघड होते. पण आम्ही समंजसपणे चांगली बॅटींग केली.' IPL 2021, MI vs CSK : चेन्नईचा एकटा खेळाडू मुंबईवर भारी! चेन्नई टॉपवर मुंबईविरुद्धच्या या विजयासोबतच चेन्नईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. 8 पैकी 6 सामन्यांमध्ये चेन्नईचा विजय झाला तर दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. तर दुसरीकडे मुंबईची टीम चौथ्या क्रमांकावर कायम आहे. मुंबईने 8 पैकी 4 मॅच जिंकल्या आणि 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला.
  Published by:News18 Desk
  First published: