मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: 'त्या ठिकाणी धोक्याची शक्यता होती' मुंबईच्या खेळाडूनं सांगितला अनुभव

IPL 2021: 'त्या ठिकाणी धोक्याची शक्यता होती' मुंबईच्या खेळाडूनं सांगितला अनुभव

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत (IPL 2021) कोरोनाचा उद्रेक झाल्यानं ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करावी लागली.  त्यानंतर बहुतेक खेळाडू आपल्या घरी परतले आहेत.

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत (IPL 2021) कोरोनाचा उद्रेक झाल्यानं ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करावी लागली. त्यानंतर बहुतेक खेळाडू आपल्या घरी परतले आहेत.

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत (IPL 2021) कोरोनाचा उद्रेक झाल्यानं ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करावी लागली. त्यानंतर बहुतेक खेळाडू आपल्या घरी परतले आहेत.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 10 मे : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत (IPL 2021) कोरोनाचा उद्रेक झाल्यानं ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करावी लागली.  त्यानंतर बहुतेक खेळाडू आपल्या घरी परतले आहेत. मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) ऑलराऊंडर जेम्स नीशम (James Neesham) देखील न्यूझीलंडमध्ये घरी परतला आहे. मुंबई इंडियन्सनं विदेशी खेळाडूंना घरी पोहचवण्यासाठी विशेष चार्टर्ड विमानाची सोय केली होती. नीशमनं घरी परतल्यानंर आपयपीलमधील अनुभव सांगितला आहे.

नीशमनं 'न्यूज हब' शी बोलताना 'आयपीएलला कोरोनाचा फटका का बसला? याचा अंदाज व्यक्त केला आहे. "बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव होण्याचं कारण सर्व टीमना देशभर करावा लागणारा विमान प्रवास असू शकतो. आम्ही चार्टर्ड विमानाानं जात होतो.पण तरीही त्यासाठी सर्व प्रकारची औपचारिकता पूर्ण करणे आवश्यक होते. त्यामुळे तिथं धोक्याची शक्यता होती." असं नीशमनं सांगितलं.

"आयपीएल टीम कोरोनामुळे संक्रमित कशा झाल्या याची आम्हाला कल्पना नाही. तुमच्या आजूबाजूला इतके लोकं असताना आणि मॅचनंतर परस्परांशी बोलणं होत असल्यानं सर्व गोष्टींची खबरदारी घेणं खूप अवघड आहे. एखाद्या टीममध्ये कोरोनाची लागण झाल्याचं उघड झाल्यानंतर मी मागच्या आठवड्यात कुणाला भेटलो? हा विचार मनामध्ये सुरु होतो," असं नीशमनं सांगितलं.

उर्वरित सामने भारतामध्ये नाहीत

दरम्यान आयपीएलच्या या सिझनमधील उर्वरित 31 सामन्यांचं आयोजन भारतामध्ये होणार  नाही, अशी माहिती बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी दिली आहे. ''खेळाडूंना 14 दिवस क्वारंटाईन होणं त्रासदायक ठरत आहे. आयपीएलचं आयोजन कधी होईल, हे सांगणं अवघड आहे, पण इंग्लंड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि युएई स्पर्धेचं आयोजन करण्याच्या रेसमध्ये आहेत.''

राहुल तेवातियानं सर्वांसमोर Kiss करुन ‘तिला’घातली लग्नाची मागणी, पाहा VIDEO

"मागच्या एका वर्षापासून आपण कोरोनामुळे त्रासलेलो आहोत. डिसेंबर 2020 ते मार्च 2021 आम्ही संघर्ष करत आहोत. सगळ्याच जणांना संघर्ष करावा लागत आहे, त्यामुळे क्रिकेटही वेगळं नाही. मागच्यावर्षी आयपीएलचं युएईमध्ये आयपीएलचं आयोजन करणं आव्हानात्मक होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सगळं काही खराब झालं. या काळात क्रिकेट स्पर्धा आयोजित करणं किती कठीण आहे, हे तुम्ही समजू शकता,'' अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली.

First published:

Tags: Coronavirus, IPL 2021, Mumbai Indians