चेन्नई, 25 एप्रिल: पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सची (MI) या सिझनमधील आजवरची कामगिरी खास झालेली नाही. मुंबईनं पाच पैकी फक्त दोन सामने जिंकले आहेत. पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध शुक्रवारी झालेल्या सामन्यात मुंबईची टीम 9 विकेट्सनं पराभूत झाली होती. या मॅचच्या दरम्यान मुंबईचा ऑल राऊंडर कायरन पोलार्डची (Kieron Pollard) एक कृती वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे त्याच्यावर अनेकांनी टीका केली. आता पोलार्डनं ट्विट (Tweet) करत टीकाकारांना उत्तर दिलं आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईची बॅटींग सुरु होती तेंव्हा हा प्रकार घडला. पंजाबचा अनुभवी बॉलर मोहम्मद शमीची (Mohammed Shami) ओव्हर सुरु होती. शमीनं बॉल टाकण्यापूर्वीच नॉन स्ट्रायकरला असलेला पोलार्ड क्रिज सोडून बराच पुढं गेला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये घडलेली ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली.
या सर्व प्रकारावर टीम इंडियाचा माजी स्पिनर आणि आयपीएल कॉमेंट्री पॅनलचा सदस्य मुरली कार्तिक (Murali Karthik) यानं नाराजी व्यक्त केली. त्यानं हे प्रकार थांबवण्यासाठी कडक नियम आणि दंडाची तरतूद करण्याची मागणी केली. अनेक ट्विटर युझर्सनी देखील या प्रकारावर नाराजी व्यक्त केली असून त्यांनी पोलार्डची ही कृती खेळ भावनेला धक्का देणारी असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
पोलार्ड काय म्हणाला?
पोलार्डनं टीकाकारांना उत्तर देताना ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये त्यानं लिहलं आहे, "मी प्रतिक्रिया देत नाही, याचा अर्थ मी तुमच्या मतांकडं लक्ष दिलं नाही असं नाही. त्यांचा उद्देश या प्रकारच्या गोष्टी करण्याचा असला तरी त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे, ' असं कॅप्शन पोलार्डनं दिलं आहे.
Got to love these individuals who suppose to be objective ... laughable at best 😇😇😇😇😇!! pic.twitter.com/tWRs4cFBpj
— Kieron Pollard (@KieronPollard55) April 24, 2021
आयपीएल 2021 मधील हा पहिलीच घटना नाही. काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात झालेल्या मॅचमध्ये देखील हा प्रकार घडला होता. त्यावेळी सीएसकेचा ऑलराऊंडर ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) राजस्थानचा फास्ट बॉलर मुस्तफिजूर रहमान यानं बॉल टाकण्याच्या पूर्वीच क्रिजच्या बाहेर होता. त्यावेळी कॉमेंट्री करणाऱ्या हर्षा भोगले यांनी ब्राव्होची ती कृती अयोग्य असल्याचं सांगितलं, आणि नियमांचे दाखला दिला होता.
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूनं पत्नीसह स्वीकारला इस्लाम
ब्राव्हो आणि पोलार्ड यांच्यावर नियमांच्या अंतर्गत कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Kieron pollard, Mumbai Indians, Punjab kings, Social media, Sports