मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : टीम इंडियाच्या स्टारला मुंबईनं वगळलं! 47 दिवसांमध्ये बदलली परिस्थिती

IPL 2021 : टीम इंडियाच्या स्टारला मुंबईनं वगळलं! 47 दिवसांमध्ये बदलली परिस्थिती

पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स (MI) या आयपीएलमधील (IPL 2021) सुरुवात चांगली झाली नाही. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सनं एक मोठा बदल केला आहे.

नवी दिल्ली, 29 एप्रिल: पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स (MI) या आयपीएलमधील (IPL 2021) सुरुवात चांगली झाली नाही. मुंबईला पहिल्या 5 पैकी फक्त 2 मॅचमध्येच विजय मिळला आहे. मुंबईनं राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सहाव्या मॅचमध्ये (MI vs RR) टीममध्ये एक मोठा बदल केला. विकेट किपर बॅट्समन इशान किशनच्या (Ishan Kishan) जागी नॅथन कुल्टर नाईलला अंतिम 11 मध्ये संधी दिली.

मागील सिझनचा हिरो

इशाननं मागील आयपीएल सिझनमध्ये (IPL 2020) मुंबईकडून सर्वात जास्त रन केले होते. त्यानं 14 मॅचमध्ये 4 अर्धशतकासह 516 रन काढले होते. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 146 होता. इशानला या सिझनमधील पहिल्या 5 मॅचमध्ये काहीही कमाल करता आली नाही. त्यानं 15 च्याी सरासरीनं फक्त 73 रन काढले. 28 हा त्याचा सर्वोच्च स्कोअर आहे. पहिल्या 5 मॅचमध्ये त्याला फक्त 3 फोर आणि 2 सिक्स मारता आले.

झारखंडकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या इशाननं 14 मार्च रोजी इंग्लंड विरुद्धच्या टी20 मॅचमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या मॅचमध्ये त्यानं 32 बॉलमध्ये आक्रमक 56 रन केले होते. यामध्ये 5 फोर आणि 4 सिक्सचा समावेश आहे. मात्र अवघ्या 46 दिवसांमध्ये त्याचा फॉर्म हरपला आहे.

IPL 2021: अभिमानास्पद! राजस्थान रॉयल्सकडून कोरोना लढ्यासाठी 7.5 कोटी मदत

मुंबईची संथ सुरुवात

कोरोना व्हायरसमुळे यंदा कोणत्याही आयपीएल टीमला त्यांच्या घरच्या मैदानावर क्रिकेट खेळता येणार नाही. याचा मोठा फटका मुंबई इंडियन्सला बसला आहे. मुंबईच्या टीमसाठी वानखेडे स्टेडियमचं पिच उपयुक्त होतं. मात्र त्यांना पहिल्या 5 मॅच चेन्नईतील खेळल्या लागल्या. चेन्नईच्या संथ पिचवर मुंबईचे बॅट्समन चांगलाच संघर्ष करताना दिसले.

First published:

Tags: IPL 2021, Mumbai Indians, Rajasthan Royals