• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • IPL 2021: धोनी पुढच्या वर्षी CSK कडून खेळणार नाही? मॅच सुरू होण्यापूर्वी केलं मोठं वक्तव्य

IPL 2021: धोनी पुढच्या वर्षी CSK कडून खेळणार नाही? मॅच सुरू होण्यापूर्वी केलं मोठं वक्तव्य

पुढील वर्षी चेन्नई सुपर किंग्सकडून (CSK) आयपीएल खेळणार की नाही? याबाबतचं एक मोठं वक्तव्य महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) केलं आहे.

  • Share this:
    दुबई, 7 ऑक्टोबर : आयपीएल स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. गुरुवार हा डबल हेडरचा दिवस असून यामधील पहिली मॅच ही पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (PBKS vs CSK) यांच्यात होत आहे. दोन्ही टीमची ही शेवटची लीग मॅच आहे. चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) टॉससाठी मैदानात उतरला त्यावेळी त्याला पुढच्या वर्षी खेळणार का? हा प्रश्न विचारण्यात आला. महेंद्रसिंह धोनीनं मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या तो फक्त आयपीएल स्पर्धेत खेळतो. सध्या 41 वर्षांचा असलेल्या धोनीचा फॉर्म देखील साधारण आहे. त्यामुळे ही धोनीची शेवटची आयपीएल स्पर्धा असेल अशी चर्चा होती. त्यामुळे कॉमेंटेटर डॅनी मॉरीसन यांनी विचारलेल्या प्रश्नाला धोनी काय उत्तर देतो याकडे जगाचं लक्ष लागलं होतं. धोनीनं या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की, 'तुम्ही मला पुढील वर्षी यलो जर्सीमध्ये बघाल. पण मी सीएसकेकडून खेळेल का हे माहिती नाही. याबाबत बरीच अनिश्चिततता आहे. दोन नव्या टीम येणार आहेत. त्यामुळे रिटेनशन रुल काय आहे हे कुणालाही माहिती नाही.' असं धोनीनं सांगितलं आहे.  धोनीच्या या वक्तव्यामुळे तो पुढील वर्षी आयपीएल स्पर्धा खेळणार की त्यापूर्वीच निवृत्त होणार याबाबतची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. धोनीनं काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्सची मालकी असलेल्या इंडिया सिमेंट्सला 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे चाहत्यांशी संवाद साधला तेव्हा त्याने निवृत्तीवर भाष्य केलं. 'जेव्हा अलविदा करायची वेळ येईल तेव्हा तुम्ही येऊ शकता आणि मला सीएसकेकडून खेळताना बघू शकता. तुम्हाला मला अलविदा करण्याची संधी मिळेल. आम्ही चेन्नईमध्ये येऊ आणि अखेरची मॅच खेळू, अशी अपेक्षा आहे. सगळ्या चाहत्यांनाही भेटू,' असं भावुक वक्तव्य धोनीने केलं होतं. IPL 2021: धोनीच्या आयपीएल निवृत्तीबाबतची मोठी बातमी! CSK मॅनेजमेंटनं केला खुलासा 2019 नंतर धोनी चेन्नईमध्ये खेळू शकलेला नाही. मागच्या मोसमात आयपीएलच्या सगळ्या मॅच युएईमध्ये झाल्या होत्या, तर या मोसमाचे पहिले 29 सामने भारतात झाले, पण कोणत्याच टीमला त्यांच्या घरच्या मैदानात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे धोनीला चेन्नईत शेवटचा सामना खेळून घरच्या प्रेक्षकांचा निरोप घ्यायचा आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण त्याच्या ताज्या वक्तव्यामुळे तो पुढच्या वर्षी खेळणार की नाही, यााबबत संभ्रम निर्माण झाला आहे.
    Published by:News18 Desk
    First published: