Home /News /sport /

IPL 2021: चेन्नईच्या अडचणीत भर, 4 खेळाडूंनी वाढवली धोनीची चिंता

IPL 2021: चेन्नईच्या अडचणीत भर, 4 खेळाडूंनी वाढवली धोनीची चिंता

आयपीएल 2021 (IPL 2021) स्पर्धेचा दुसरा टप्पा येत्या रविवारपासून सुरु होत आहे. सर्व टीमची या स्पर्धेसाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्याचवेळी महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि चेन्नई सुपर किंग्सची (CSK) टीम सध्या काळजीत आहे.

    मुंबई, 13 सप्टेंबर : आयपीएल 2021 (IPL 2021) स्पर्धेचा दुसरा टप्पा येत्या रविवारपासून सुरु होत आहे. सर्व टीमची या स्पर्धेसाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्याचवेळी महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि चेन्नई सुपर किंग्सची (CSK) टीम सध्या काळजीत आहे. सध्या 10 पॉईंट्ससह पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या नंबरवर असलेली चेन्नईची टीम 4 खेळाडूंमुळे काळजीत आहे. धोनीचे आधारस्तंभ असणारे ड्वेन ब्राव्हो, फाफ ड्यू प्लेसिस, सॅम करन आणि मोईन अली हे चौघे जण सध्या त्याच्या काळजीचं कारण बनले आहेत. ब्राव्होला कॅरेबीयन प्रीमियर लीग (CPL 2021) स्पर्धेच्या दरम्यान दुखापत झाली होती. त्यानं आता स्पर्धेत पुनरागमन केलं आहे, पण बॉलिंग केलेली नाही. सेंट लुसिया किंग्जचा कॅप्टन आणि चेन्नईचा ओपनिंग बॅट्समन फाफ ड्यू प्लेसिस जखमी झालाय. त्यामुळे तो बार्बाडोस विरुद्धच्या लढतीमध्ये खेळला नाही. ब्राव्हो आणि ड्यूप्लेसिस शिवाय सॅम करन आणि मोईन अली या ऑल राऊंडरमुळे देखील चेन्नईची चिंता वाढली आहे. T20 वर्ल्ड कपनंतर धोनी टीम इंडियासोबत राहणार का? गांगुलीनं दिलं उत्तर इंग्लंडची टीम 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये दोन टी20 सामने खेळणार आहे. त्यासाठी सर्व खेळाडूंना 9 ऑक्टोबरपर्यंत इंग्लंडमध्ये दाखल होण्याचे आदेश इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) दिले आहेत. त्यामुळे हे दोघं आयपीए स्पर्धेच्या 'प्ले ऑफ' साठी उपलब्ध नसतील. त्यामुळे स्पर्धेच्या निर्णायक टप्प्यात धोनीला या खेळाडूंची कमतरता जाणवार आहे. आयपीएलचे 'प्ले ऑफ' सामने 10 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. तर फायनल मॅच 15 ऑक्टोबरला होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Csk, IPL 2021, MS Dhoni

    पुढील बातम्या