Home /News /sport /

IPL 2022 मध्ये धोनी खेळणार की नाही? CSK च्या CEO चं मोठं वक्तव्य

IPL 2022 मध्ये धोनी खेळणार की नाही? CSK च्या CEO चं मोठं वक्तव्य

महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) बुधवारी ( 7 जुलै) 40 वर्षांचा झाला आहे. पुढील आयपीएलपूर्वी (IPL 2022) मेगा ऑक्शन असल्यानं धोनी पुढच्या सिझनमध्ये खेळणार की नाही ही चर्चा आता सुरू झाली आहे.

    मुंबई, 8 जुलै: कोरोना व्हायरसमुळे स्थगित झालेल्या आयपीएल स्पर्धेचा उत्तरार्ध (IPL 2021) आता सप्टेंबर महिन्यात यूएईमध्ये सुरू होणार आहे. या स्पर्धेची तयारी करत असतानाच सर्व टीमनं आता पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलचे नियोजन सुरू केले आहे. पुढील आयपीएलमध्ये (IPL 2022) आणखी दोन टीम दाखल होणार आहेत. त्याचबरोबर मेगा ऑक्शन (Mega Auction) देखील होईल. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कॅप्टन महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) भवितव्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. धोनी बुधवारी ( 7 जुलै) 40 वर्षांचा झाला आहे. त्याने मागच्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता तो फक्त आयपीएल स्पर्धेत खेळतो. धोनीचा फिटनेस आजही चांगला असला तरी त्याच्या बॅटींगमधील फॉर्म हा काळजीचा विषय आहे. त्यामुळे तो पुढील वर्षी होणाऱ्या मेगा ऑक्शननंतर आयपीएल खेळेल का? हा प्रश्न विचारला जात आहे. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन (Kasi Vishwanathn) यांनी धोनीच्या भवितव्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 'तो पूर्णपणे फिट आहे. तो आणखी किमान एक ते दोन वर्षी सीएसकेकडून खेळेल. त्याने निवृत्ती घेण्याचं कोणतंही कारण मला दिसत नाही. आम्ही त्याच्या कामगिरीवर समाधानी आहोत. तो फक्त कॅप्टनच नाही तर अनुभवी नेता आहे. त्याच्या मार्गदर्शनाचा टीमला नेहमी फायदा होतो. त्याच्यासारखा खेळाडू टीममध्ये असणे हे महत्त्वाचे आहे. तो उत्तम फिनिशर असून त्याने आजवर ती जबाबदारी  पूर्ण केली आहे,' असे विश्वनाथन यांनी स्पष्ट केले. मेस्सीनं जिंकलं मन! पायातून रक्त गळत असतानाही सोडले नाही मैदान, पाहा VIDEO ऑस्ट्रेलियन खेळाडूचं भविष्य महेंद्रसिंह धोनी चेन्नईची टीम कधीही सोडणार नाही. तो चेन्नईकडून खेळला नाही तर त्या टीमचा प्रशिक्षक होईल, असं भविष्य ऑस्ट्रेलियाचा स्पिनर ब्रॅड हॉगनं व्यक्त केलं आहे. धोनी हा चेन्नई सुपर किंग्सचा पहिल्या सिझनपासून कॅप्टन आहे. त्याच्याच कॅप्टनसीमध्ये टीमनं तीन वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद जिंकले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni, Sports

    पुढील बातम्या