चेन्नई, 18 एप्रिल: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) शनिवारच्या मॅचमधील विजयाचं श्रेय बॉलर्सना दिलं आहे. मुंबईकडून राहुल चहर (Rahul Chahar) आणि ट्रेंट बोल्ट (Trent Boult) यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यानं 4 ओव्हरमध्ये 14 रन देत एक विकेट घेतली.
मुंबईच्या विजयानंतर बोलताना रोहित म्हणाला, "बॉलर्सनी जोरदार कामगिरी केली. त्यांना (SRH) टार्गेटचा पाठलाग करणं सोपं होणार नाही, हे आम्हाला माहिती होतं. या प्रकारच्या पिटचवर बॉलर्सनी योजनेप्रमाणे बॉलिंग केली तर कॅप्टनचं काम सोपं होतं." असं रोहितनं सांगितलं.
मुंबई इंडियन्सनं कायरन पोलार्डच्या 22 बॉल 35 रनच्या नाबाद खेळीच्या जोरावर 5 आऊट 150 रन केले. तर हैदाराबादची टीम 137 वर आटोपली. "आम्हाला मधल्या ओव्हर्समध्ये चांगली बॅटींग करावी लागे. दोन्ही टीमनी 'पॉवर प्ले' चा फायदा उठवला. पण, आम्ही मधल्या ओव्हरमध्ये चांगले रन करु शकलो असतो," असं रोहितनं स्पष्ट केलं. "त्यांच्या टीममध्ये राशिद आणि मुजीब सारखे बॉलर होते. त्यांच्याविरुद्ध रन काढणं सोपं नाही. पिच स्लो होत होतं, त्यामुळे स्पिनर किंवा फास्ट बॉलरच्या विरुद्ध रन बनवणे सोपे नव्हते,'' हे रोहितनं मान्य केलं.
'मॅन ऑफ द मॅच' कायरन पोलार्डनं सांगितलं की, " आम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये जास्त रन काढण्याची पद्धत शोधली पाहिजे. मी काही अतिरिक्त रन काढले, त्यामुळे टीमचा फायदा झाला. या प्रकारच्या पिचवर तुम्हाला खेळायला कमी बॉल तर अडचण येऊ शकते. आम्ही या परिस्थितीचा अभ्यास करत आहोत. या प्रकारच्या विजयानंतर आत्मविश्वास वाढतो. मला माझी जबाबदारी पूर्ण केल्याचं समाधान आहे."
IPL 2021: जॉनी बेअरस्टोच्या सिक्सनं फुटलं फ्रिज! SRH चे खेळाडू थोडक्यात बचावले
या विजयानं मुंबई इंडियन्स पॉईंट्स टेबलमध्ये नंबर 1 वर पोहचली आहे. मुंबई इंडियन्सची पुढील मॅच 20 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Jasprit bumrah, Mumbai Indians, Rohit sharma, Sunrisers hyderabad