मुंबई, 29 सप्टेंबर: मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज (Mumbai Indians vs Punjab Kings) यांच्यात मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये खेळ भावनेचं चांगलं उदाहरण पाहायला मिळालं. मुंबई आणि पंजाब या दोन्ही टीमसाठी ही मॅच महत्त्वाची होती. यामध्ये मुंबई इंडियन्सचा (MI) कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) यानं निर्णायक क्षणी खेळ भावना जपली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाला असून रोहित दाखवलेल्या मोठ्या मनाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
काय घडले प्रकरण?
पंजाब किंग्जच्या इनिंगमधील सहाव्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. यावेळी मुंबईकडून कृणाल पांड्या (Krunal Pandya) बॉलिंग करत होता. पंजाबचा ख्रिस गेल (Chris Gayle) स्ट्राईकवर होता. तर केएल राहुल (KL Rahul) नॉन स्ट्राईकवर होता. कृणालच्या बॉलवर गेलनं सरळ शॉट मारला होता. गेलनं मारलेला बॉल राहुलच्या पायाला लागून कृणालच्या हातामध्ये आला. बॉल पायाला लागल्यानं एक रन काढण्यासाठी क्रिजच्या बाहेर आलेला राहुल थोडा अडखळला. त्यावेळी कृणालनं लगेच बॉल स्टंपवर मारला आणि रन आऊटचं अपिल केलं.
मैदानावरील अंपायरनं लगेच थर्ड अंपायरकडं इशारा केला. त्यावेळी रोहित शर्मानं लगेच हे अपिल मागे घेतलं. राहुल हा पंजाबचा सर्वात यशस्वी बॅट्समन आहे. तो रन आऊट झाला की नाही हे पुरेसं स्पष्ट नव्हतं. या निर्णयाचा कदाचित मुंबईला फटका बसला असता. पण, रोहितनं निर्णायक क्षणी खेळ भावना जपल्यानं क्रिकेट फॅन्स त्याची प्रशंसा करत आहेत. राहुलनंही रोहितला थम्स अप करत या निर्णयाला दाद दिली.
— Simran (@CowCorner9) September 28, 2021
मुंबईचा पंजाबवर विजय
मुंबई इंडियन्सनं पराभवाची मालिका तोडत पंजाब किंग्जवर 6 विकेट्सनं विजय मिळवला. मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये मुंबईनं इशान किशनच्या जागी सौरभ तिवारीचा समावेश केला होता. सौरभने संधीचं सोनं करत ४५ रन्सची दमदार खेळी केली. यात त्याने २ सिक्स आणि ३ चौकार लगावले. तर क्विंटन डिकॉक २७ रन्सची खेळी केली.
VIDEO : पंतचा स्टंट पडला असता कार्तिकवर भारी! थोडक्यात टळला भयंकर अपघात
कॅप्टन रोहित शर्माने मात्र या बॅटींगमध्ये निराशा केली. अवघे 8 रन्स करून तो माघारी परतला. त्यानंतर सुर्यकुमार यादवही फार काही कमाल करू शकला नाही, तोही माघारी परतला. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि पोलार्डने दमदार खेळी करत विजयाचा मार्ग सोपा केला. हार्दिकने तडाखेबाज फलंदाजी करत 40 रन्स केले आणि टीमला विजय मिळवून दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.