मुंबई, 29 सप्टेंबर : मुंबई इंडियन्सनं पंजाब किंग्जचा (MI vs PBKS) 6 विकेट्सनं पराभव करत 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश करण्याची दावेदारी कायम ठेवली आहे. तीन सलग पराभवानंतर मुंबईनं हा विजय मिळवला आहे. या विजयानंतर मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) सौरभ तिवारीचं कौतुक केलं आहे. सौरभ मैदानावर आला होता त्यावेळी मुंबईची स्थिती 2 आऊट 16 अशी होती. त्यानंतर सौरभनं 37 बॉलमध्ये 45 रन करत मुंबईला मॅच जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
या आयपीएलमध्ये फॉर्मात नसलेल्या इशान किशनच्या (Ishan Kishan) जागी सौरभ तिवारीचा समावेश करण्यात आला आहे. रोहितनं याबद्दल सांगितलं की, 'इशानला टीमच्या बाहेर ठेवणे अवघड होते. पण टीममध्ये बदल करण्याची गरज आहे, असं आम्हाला वाटलं. तो एक चांगला खेळाडू आहे. त्याच्यासाठी टीमचे दरवाजे बंद झालेले नाहीत. सौरभ तिवारीनं चेन्नई विरुद्ध अर्धशतक झळकावलं होतं. त्यानं या मॅचमध्येही चांगली बॅटींग केली.'
रोहितनं हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खेळीवरही समाधान व्यक्त केलं. 'हार्दिकनं पिचवर पुरेसा वेळ घालवला. हा भविष्यासाठी चांगला संकेत आहे,' असं रोहित म्हणाला. हार्दिकनं 40 रनची नाबाद खेळी केली.'
T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात बदल होणार! मुंबईच्या निर्णयानं चर्चेला जोर
विराटनंही केली होती चर्चा
मुंबई इंडियन्सचा बॅटर इशान किशनची (Ishan Kishan) टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झाली आहे. या आक्रमक खेळाडूकडून भारतीय क्रिकेट टीमला मोठी आशा आहे. पण, इशान या आयपीएलमध्ये 'आऊट ऑफ फॉर्म' आहे. ज्या पिचवर आयपीएलनंतर लगेच टी 20 वर्ल्ड कप होणार आहे, तिथं इशान रन काढण्यासाठी झगडत आहे.
मोठ्या मनाचा रोहित! निर्णायक क्षणी खेळ भावना जपत जिंकलं सर्वांचं मन! VIDEO
या स्पर्धेत वारंवार अपयशी ठरणाऱ्या इशानची आरसीबीच्या मॅचनंतर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) यानं भेट घेतली होती. विराटनं त्याच्याशी चर्चा करुन त्याला धीर दिला. या भेटीचे फोटो व्हायरल झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Ishan kishan, Rohit sharma