मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: 'हे शमीमुळे शक्य झालं', हार्दिकनं चांगल्या खेळीचं दिलं पंजाबच्या बॉलरला श्रेय

IPL 2021: 'हे शमीमुळे शक्य झालं', हार्दिकनं चांगल्या खेळीचं दिलं पंजाबच्या बॉलरला श्रेय

स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) फॉर्मबद्दल प्रश्न विचारले जात होते. पंजाब किंग्ज विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये (Mumbai Indians vs Punjab Kings) त्यानं बॅटनं कमाल केली.

मुंबई, 29 सप्टेंबर : स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) फॉर्मबद्दल प्रश्न विचारले जात होते. पंजाब किंग्ज विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये (Mumbai Indians vs Punjab Kings) त्यानं बॅटनं कमाल केली. त्यानं  मुंबई इंडियन्ससाठी (MI) 133.33 च्या स्ट्राईक रेटनं नाबाद 40 रन काढले. हार्दिकच्या या खेळीमुळे मुंबईनं पंजाबवर 6 विकेट्सनं विजय मिळवला. यूएई लीगमधील मुंबईचा हा पहिला विजय आहे.

हार्दिक पांड्यानं या इनिंगमध्ये कुठं टर्निंग पॉईंट आला ते सांगितलं आहे.  त्याला या मॅचच्या दरम्यान मोहम्मद शमीचा (Mohammed Shami)  बाऊन्सर लागला. तो बाऊन्सर लागेपर्यंत खेळायला अवघड जात होते, हे हार्दिकनं मान्य केलं. एका खेळाडूसाठी प्रत्येक संधी ही नवी असते. तो टीमला विजय मिळवून देऊ शकतो.

फॉर्मात नसलेल्या इशान किशनच्या भवितव्याबाबत रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, म्हणाला...

हार्दक आयपीएल टी20 डॉट कॉमशी बोलताना म्हणाला की, ' प्रामाणिकपणे सांगायचं तर, मी या खेळीचं श्रेय मोहम्मद शमीला देतो. कारण, मला त्याचा बॉल लागला होता. त्यानंतर मी पोलार्डला सांगितलं की, त्यानं मला जागं केलं. त्यानंतर माझी परिस्थिती बदलली. त्यापूर्वी मला खेळायला जड जात होतं.पण प्रत्येक मॅच ही नवी संधी असल्यांचं मी मानतो.

RCB vs RR, Dream 11 Prediction : 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं नशीब

तुम्ही हिरो बनू शकता. टीमला विजय मिळवून देऊ शकता. मी भूतकाळात काय घडलं आहे, हे विसरून माझं 100 टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करतो,' असं हार्दिकनं यावेळी स्पष्ट केलं.  या मॅचमध्ये कायरन पोलार्डला (Kieron Pollard) 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यानं 2 विकेट्स घेतल्या. तसंच 7 बॉलमध्ये नाबाद 15 रन काढले. आयपीएलमधील पुढील मॅच 2 ऑक्टोबर रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे.

First published:
top videos

    Tags: Hardik pandya, IPL 2021