मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: ब्लॉकबस्टर शनिवार! मुंबई विरुद्ध चेन्नई मॅचला मिळाले तब्बल इतके Views

IPL 2021: ब्लॉकबस्टर शनिवार! मुंबई विरुद्ध चेन्नई मॅचला मिळाले तब्बल इतके Views

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) या दोन बलाढ्य टीममध्ये झालेल्या शनिवारच्या मॅचमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटची जादू दिसली आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) या दोन बलाढ्य टीममध्ये झालेल्या शनिवारच्या मॅचमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटची जादू दिसली आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) या दोन बलाढ्य टीममध्ये झालेल्या शनिवारच्या मॅचमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटची जादू दिसली आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 2 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) या दोन बलाढ्य टीममध्ये झालेल्या शनिवारच्या मॅचमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटची जादू दिसली आहे. 5 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणारी मुंबई इंडियन्स आणि 3 वेळा आयपीएल चॅम्पियन असलेले चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील लढती या नेहमीच चुरशीच्या होतात. शनिवारची लढत देखील त्याला अपवाद ठरली नाही. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत या मॅचमध्ये तीन्ही रिझल्ट शक्य होते. T20 क्रिकेटचा थरार दाखवणाऱ्या या मॅचनं हॉटस्टारवर (Hotstar) विक्रमी Views मिळाले आहेत. मुंबई इंडियन्सला या मॅचमध्ये विजयासाठी 219 रनची आवश्यकता होती. कायरन पोलार्डच्या (Kieron Pollard) वादळी खेळीमुळे मुंबईनं हे आव्हान 4 विकेट्स राखून पूर्ण केलं. मुंबईचा आयपीएल इतिहासातला हा सगळ्यात यशस्वी पाठलाग होता. पोलार्डने 34 बॉलमध्ये नाबाद 87 रनची खेळी केली, यामध्ये त्याने 6 फोर आणि 8 सिक्स मारले. तब्बल 255.88 च्या स्ट्राईक रेटने पोलार्डने बॅटिंग केली. यापूर्वी अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याची वादळी खेळी आणि फाफ डुप्लेसिस (Faf du Plessis), मोईन अलीच्या (Moeen Ali) अर्धशतकामुळे चेन्नईने मुंबईला (CSK vs MI) विजयासाठी 219 रनचं आव्हान दिलं होतं. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून चेन्नईला पहिले बॅटिंगसाठी बोलावलं, यानंतर त्यांनी 20 ओव्हरमध्ये 4 आऊट 218  एवढा स्कोअर केला. अंबाती रायुडूने 27 बॉलमध्ये नाबाद 72 रनची खेळी केली, यामध्ये 7 सिक्स आणि 4 फोरचा समावेश होता. रायुडूने तब्बल 266.77 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. मुंबईकडून कायरन पोलार्ड सगळ्यात यशस्वी ठरला, त्याने 2 ओव्हरमध्ये 12 रन देऊन 2 विकेट घेतल्या, तर बोल्टला आणि बुमराहला 1-1 विकेट मिळाली. रायुडूशिवाय मोईन अलीने 36 बॉलमध्ये 58 आणि फाफ डुप्लेसिसने 28 बॉलमध्ये 50 रन केले. IPL चा खिलाडी हरप्रितची अक्षयवरील कमेंट Viral, म्हणाला 'पैशासाठी पगडी घालत नाही मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील ही थरारक मॅच हॉटस्टारवर एकाचवेळी तब्बल 78 लाख जणांनी पाहिली आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि कॉमेंट्रेटर बोरिया मुजूमदार (Boria Majumdar) यांनी ही माहिती ट्विटरवर दिली आहे.  78 लाख जणांनी आज रात्री ही मॅच एकाच वेळी  पाहिली. तर लाखो जण टीव्हीवर पाहत होते.  यापैकी कुणीही इतरत्र बाहेर भटकत नव्हतं. उलट सुरक्षितपणे मॅच पाहत होते. लोकांनी घरात राहवं म्हणून तुम्ही करु शकत असलेला हा सर्वोत्तम उपाय आहे. रोहित शर्मानं देखील ही माझ्या आयुष्यातील एक सर्वोत्त मॅच असल्याचं सांगितलं आहे, असं ट्विट बोरिया यांनी केलं आहे. मुंबईचा हा या सिझनमधील चौथा विजय असून चेन्नईचा दुसराच पराभव आहे. आता मुंबई इंडियन्सची पुढील मॅच मंगळवारी सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध तर चेन्नईची मॅच बुधवारी राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध होणार आहे.
First published:

Tags: Cricket, Csk, IPL 2021, Kieron pollard, Mumbai Indians

पुढील बातम्या