मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सनं 50 बॉलमध्ये केला मोठा रेकॉर्ड, कुणीही नाही जवळपास

IPL 2021: रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सनं 50 बॉलमध्ये केला मोठा रेकॉर्ड, कुणीही नाही जवळपास

मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सचा (Rajsthan Royals) 8 विकेट्सनं पराभव केला. या विजयाबरोबरच मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुंबई इंडियन्सनं एक मोठा रेकॉर्ड केला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 6 ऑक्टोबर: मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) नं मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सचा (Rajsthan Royals) 8 विकेट्सनं पराभव केला. या विजयमामुळे मुंबईच्या 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश करण्याच्या आशा बाकी आहेत. राजस्थानच्या टीमनं पहिल्यांदा बॅटींग करताना फक्त 90 रन काढले. मुंबईनं हे लक्ष्य 8.2 ओव्हरमध्ये म्हणजे फक्त 50 बॉलमध्ये पूर्ण केलं. या विजयाबरोबरच मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुंबई इंडियन्सनं एक मोठा रेकॉर्ड केला आहे.

टी20 क्रिकेटमध्ये 400 सिक्स लगावणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय बनला आहे. या मॅचपूर्वी त्यानं 398 सिक्स लगावले होते. राजस्थान रॉयल्सविरुद्ध 2 सिक्स लगावत त्यानं हा टप्पा गाठला आहे. भारतीय खेळाडूंमध्ये सुरेश रैना (Suresh Raina) दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 325 सिक्स लगावले आहेत.  टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 1042 सिक्स ख्रिस गेलनं (Chris Gayle) लगावलेत. 1000 पेक्षा जास्त सिक्स लगावणारा तो जगातील एकमेव बॅटर आहे.

मुंबई इंडियन्सचा तगडा रेकॉर्ड

मुंबई इंडियन्सनं राजस्थान रॉयल्स विरुद्ध 70 बॉल राखून हे लक्ष्य पूर्ण केलं. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 70 किंवा त्यापेक्षा जास्त बॉल राखून मॅच जिंकणारी मुंबई ही पहिली टीम बनली आहे. यापूर्वी 2008 साली मुंबई इंडियन्सचा केकेआरचा 87 बॉल राखून पराभव केला होता. त्या मॅचमध्ये केकेआरची टीम 67 बॉलमध्ये आऊट झाली होती. मुंबईनं ते लक्ष्य 53 बॉलमध्ये पूर्ण केलं होतं.

IPL 2021 Playoff: मुंबई इंडियन्सच्या आशा वाढल्या, 'या' पद्धतीनं मिळेल टॉप 4 मध्ये प्रवेश

राजस्थानने दिलेलं 91 रनचं आव्हान मुंबईने फक्त 8.2 ओव्हरमध्येच 2 विकेट गमावून पूर्ण केलं. इशान किशनने (Ishan Kishan) 25 बॉलमध्ये नाबाद 50 रनची खेळी केली. तर रोहित शर्माने (Rohit Sharma) 22 आणि सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 13 रन केले. हार्दिक पांड्या 5 रनवर नाबाद राहिला.

IPL 2021: रोहित शर्माची अचूक चाल, T20 World Cup पूर्वी टीम इंडियाला Good News

या धमाकेदार विजयामुळे मुंबईच्या नेट रनरेटलाही बूस्टर डोस मिळाला आहे. राजस्थानविरुद्धच्या मॅचआधी मुंबईचा नेट रन रेट -0.453 एवढा होता, तर या सामन्यानंतर हाच नेट रनरेट -0.048 झाला आहे. या विजयामुळे मुंबईचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं स्वप्नही अजून कायम आहे. तर प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचं राजस्थानचं स्वप्न जवळपास संपुष्टात आलं आहे.

First published:

Tags: IPL 2021, Mumbai Indians, Rohit sharma