मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021, RCB vs PBKS : आरसीबीनं टॉस जिंकला, पंजाबच्या टीममध्ये 3 बदल

IPL 2021, RCB vs PBKS : आरसीबीनं टॉस जिंकला, पंजाबच्या टीममध्ये 3 बदल

आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) रविवार हा डबल हेडरचा दिवस आहे. यापैकी पहिली मॅच  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात होत आहे.

आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) रविवार हा डबल हेडरचा दिवस आहे. यापैकी पहिली मॅच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात होत आहे.

आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) रविवार हा डबल हेडरचा दिवस आहे. यापैकी पहिली मॅच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात होत आहे.

  • Published by:  News18 Desk
शारजाह, 3 ऑक्टोबर : आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) रविवार हा डबल हेडरचा दिवस आहे. यापैकी पहिली मॅच  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात होत आहे. आयपीएल स्पर्धा आता निर्णायक टप्प्यात आलेली आहे. त्यामुळे ही मॅच जिंकणे दोन्ही टीमसाठी आवश्यक आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) आत्तापर्यंत 11 पैकी 7 मॅच जिंकल्या असून ही टीम 14 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आरसीबीनं ही मॅच जिंकल्यास त्यांचे 16 पॉईंट्स होतील आणि टीम 'प्ले ऑफ'साठी (IPL Playoff) पात्र होईल. दुसरिकडं पंजाबचे 11 मॅचनंतर 5 विजय आणि 6 पराभवासह 10 पॉईंट्स आहेत. पंजाबची टीम सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांना 'प्ले ऑफ'मध्ये प्रवेश करण्यासाठी ही मॅच जिंकणे आवश्यक आहे. या मॅचमध्ये आरसीबीचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीनं राजस्थान रॉयल्सला पराभूत केलेल्या टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर पंजाबच्या टीममध्ये 3 बदल करण्यात आले आहेत. पंजाबनं या महत्त्वाच्या मॅचमध्ये सर्फराज खान, मोईसेस हेन्रीक्स आणि हरप्रीत बरार यांचा समावेश केला आहे. आरसीबीनं यापूर्वी 2019 साली पंजाबचा पराभव केला होता. दोन्ही टीममध्ये आत्तापर्यंत 27 मॅच झाल्या असून यामध्ये 15 विजयासह पंजाब आघाडीवर आहे. पंजाबची मदार कॅप्टन केएल राहुलसह मयांक अगरवाल, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंगवर आहे. शाहरुख खानकडूनही पंजाबला फटकेबाजीची अपेक्षा आहे. RCB vs PBKS Dream 11 Prediction: 'हे' 11 खेळाडू ठरतील तुमच्यासाठी गेमचेंजर आरसीबीची भिस्त ही विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल या ओपनिंग जोडीवर आहे. ऑल राऊंडर ग्लेन मॅक्सवेल चांगल्या फॉर्मात आहे. त्याचबरोबर एबी डिविलियर्सचाही पंजाबविरुद्धचा रेकॉर्ड चांगला आहे. आरसीबच्या बॉलिंगची भिस्त पर्पल कॅपच्या शर्यतीमध्ये सर्वात आघाडीवर असलेल्या हर्षल पटेलवर असेल. त्याचबरोबर युजवेंद्र चहललाही सूर गवसल्यानं पंजाबला त्याच्याविरुद्ध सावध राहावं लागेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : विराट कोहली (कॅप्टन), देवदत्त पडिक्कल, श्रीकर भरत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स, डॅन ख्रिस्टीन, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, जॉर्ज गार्टन, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज पंजाब किंग्ज : केएल राहुल (कॅप्टन), मयांक अगरवाल, निकोलस पूरन, एडेन मार्करम, सर्फराज खान, शाहरूख खान, मोईसेस हेन्रीक्स, हरप्रीत बरार, मोहम्मद शमी, अर्शदीप  सिंग आणि रवी बिश्नोई
First published:

Tags: IPL 2021, Punjab kings, RCB

पुढील बातम्या