• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • KKR vs PBKS, Dream 11 Prediction : 'हे' 11 खेळाडू बदलतील तुमचं नशीब

KKR vs PBKS, Dream 11 Prediction : 'हे' 11 खेळाडू बदलतील तुमचं नशीब

आयपीएल स्पर्धेतील 45 व्या लढतीमध्ये शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata knight Riders) सामना पंजाब किंग्स (Punjab Kings) विरुद्ध होणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 1 ऑक्टोबर : आयपीएल स्पर्धेतील 45 व्या लढतीमध्ये शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सचा  (Kolkata knight Riders) सामना पंजाब किंग्स (Punjab Kings) विरुद्ध होणार आहे. दुबई क्रिकेट स्टेडियममध्ये ही लढत होणार आहे. इयन मॉर्गन (Eoin Morgan) याच्या कॅप्टनसीमध्ये खेळणारी कोलकाताची टीम 11 पैकी 5 मॅच जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये (IPL 2021 Points Table) चौथ्या क्रमांकावर आहे. तर पंजाबची टीम 11 पैकी 4 मॅच जिंकून सहाव्या क्रमांकावर आहे. या मॅचमध्ये सर्वांचं लक्ष कोलकाताचा ऑल राऊंडर व्यंकटेश अय्यर आणि पंजाबचा बॉलर रवी बिश्नोईवर असेल. व्यंकटेश अय्यरनं शिस्तबद्ध बॉलिंग आणि आक्रमक बॅटींगनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तर रवी बिश्नोईनं मागील दोन सिझनपासून दिग्गज खेळाडूंना त्रस्त केलं आहे.  केएल राहुलच्या (KL Rahul) पंजाब टीमला 'प्ले ऑफ' च्या शर्यतीमध्ये राहण्यासाठी ही 'करो वा मरो' ची लढत आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध टीमला दबावात चांगला खेळ करता आला नाही, हे राहुलनं मान्य केलं होतं. तर कोलकातानं यूएईमध्ये झालेल्या चार पैकी तीन मॅच जिंकल्या आहेत. कोलकातानं शेवटच्या मॅचमध्ये बलाढ्य दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) पराभव केला. पण, कॅप्टन मॉर्गनचा फॉर्म हा त्यांच्यासाठी काळजीचा विषय आहे. IPL 2021: पंजाबला मोठा धक्का, ख्रिस गेल आयपीएलमधून बाहेर! ‘हे’ आहे कारण KKR vs PBKS Dream 11 कॅप्टन : केएल राहुल व्हाईस कॅप्टन - व्यंकटेश अय्यर विकेटकिपर - दिनेश कार्तिक बॅटर - मयांक अग्रवाल, एडेन मार्कराम ऑल राऊंडर्स - आंद्रे रसेल, सुनील नरेन बॉलर - वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी ORANGE CAP: संभाव्य टीम कोलकाता नाईट रायडर्स : शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, इयन मॉर्गन (कॅप्टन), नितिश राणा, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, सुनील नरेन, कॉलीन फर्ग्युसन, प्रसिद्ध कृष्णा आणि वरुण चक्रवर्ती पंजाब किंग्ज : केएल राहुल (कॅप्टन), मयांक अग्रवाल, मनदीप सिंह, एडेन मार्करम, निकोलस पूरन, दीपक हुडा, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग
  Published by:News18 Desk
  First published: