Home /News /sport /

IPL 2021, MI vs RCB: क्रिकेट फॅन्ससाठी Super Sunday, टीम इंडियाचे 2 कॅप्टन आमने-सामने

IPL 2021, MI vs RCB: क्रिकेट फॅन्ससाठी Super Sunday, टीम इंडियाचे 2 कॅप्टन आमने-सामने

विराटचा (Virat Kohli) वारसदार म्हणून रोहितचं (Rohit Sharma) नाव सर्वात आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या आजी आणि भावी कॅप्टनमधील लढतीकडं सर्वांचं लक्ष असेल.

    दुबई, 26 सप्टेंबर : आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) क्रिकेट फॅन्सना सुपर संडेचा थरार पाहायला मिळणार आहे. दुबईमध्ये होणाऱ्या लढतीमध्ये टीम इंडियाच्या टी20 टीमचे आजी आणि भावी कॅप्टन आमने-सामने असतील. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सामना विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी ( Royal Challengers Banglore) होणार आहे. या दोन्ही टीमनं सेकंड हाफमधील पहिल्या दोन लढती गमावल्या आहेत. त्यामुळे या हाफमध्ये पहिल्या विजयासाठी या टीम मैदानात उतरतील. आयपीएल 2021 मध्ये यापूर्वी झालेल्या लढतीमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) 2 विकेट्सनं पराभव केला होता .दोन टीममधील शेवटच्या पाच लढतीचा इतिहास मुंबईच्या बाजूनं आहे. मुंबईनं पाचपैकी 3 सामने जिंकले आहेत. तर IPL स्पर्धेत दोन्ही टीम एकमेकांशी 30 वेळा भिडल्या आहेत. यामध्ये रोहित शर्माच्या टीमनं 19 वेळा तर विराट कोहलीच्या टीमनं 11 वेळा विजय मिळवला आहे. रोहित शर्मा विरुद्ध विराट कोहली विराट कोहलीनं आगमी टी20 वर्ल्ड कपनंतर या प्रकारातील टीम इंडियाची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विराटचा वारसदार म्हणून रोहितचं नाव सर्वात आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या आजी आणि भावी कॅप्टनमधील लढतीकडं सर्वांचं लक्ष असेल. या दोन्ही टीमची खरी शक्ती हे त्यांचे कॅप्टन आहेत. रोहित शर्मा इंग्लंड दौऱ्यामध्येही फॉर्मात होता. तर विराट कोहलीनं चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध दमदार अर्धशतक झळकावलं आहे. IPL 2021: पोलार्ड आणि कृष्णा एकमेकांना भिडले, मैदानात वाढला पारा! पाहा VIDEO मुंबईच्या कामगिरीवर विराटचं लक्ष मुंबई इंडियन्सचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सेकंड हाफमध्ये अद्यापही एकही मॅच खेळलेला नाही. त्यामुळे तो आज खेळणार का? याची मोठी उत्सुकता आहे. त्याचा फिटनेस विराटसह टीम इंडियाची चिंता वाढवणारा आहे. आयपीएलच्या पहिल्या राऊंडमध्ये हार्दिकने फार बॉलिंग केली नाही, तर दुसऱ्या राऊंडच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये तो फिट नसल्यामुळे खेळू शकला नाही. आयपीएलच्या पहिल्या राऊंडमध्ये हार्दिक बॅटनेही संघर्ष करत होता. 7 सामन्यांमध्ये फक्त 8 च्या सरासरीने त्याने 52 रन केले आहेत. T20 World Cup: हार्दिक पांड्याची टीम इंडियात निवड कशी झाली? माजी क्रिकेटपटूनं विचारला प्रश्न सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांनाही या आयपीएलमध्ये संघर्ष करावा लागला आहे, तसंच या दोघांच्या शॉट सिलेक्शनवरही टीका होत आहे. सूर्याने या मोसमातल्या 9 सामन्यांमध्ये 20.11 च्या सरासरीने 181 रन केले ज्यात एक अर्धशतक आहे. तर इशान किशनने 7 सामन्यांमध्ये फक्त 14 च्या सरासरीने 98 रन केले. इशान किशनला या मोसमात एकही अर्धशतक करता आलेलं नाही. या सर्वांची आगामी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात निवड झाली आहे, त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडं विराटचंही लक्ष असेल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, Rohit sharma, Virat kohli

    पुढील बातम्या