• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021, DC vs RR: नंबर 1 बॉलर 5 वर्षांनी मैदानात, सर्वात महागड्या खेळाडूच्या जागी संधी

IPL 2021, DC vs RR: नंबर 1 बॉलर 5 वर्षांनी मैदानात, सर्वात महागड्या खेळाडूच्या जागी संधी

आयपीएल स्पर्धेतील 36 वी मॅच दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (DC vs RR) यांच्यात होत आहे. या मॅचमध्ये राजस्थाननं टी20 क्रिकेटमध्ये नंबर 1 वर असलेल्या बॉलरला संधी दिली आहे.

 • Share this:
  अबुधाबी, 25  सप्टेंबर : आयपीएल स्पर्धेतील 36 वी मॅच दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (DC vs RR) यांच्यात होत आहे. या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन (Sanju Samson) यानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. राजस्थाननं यूएई लीगमधील पहिल्या मॅचमध्ये 2 रननं निसटता विजय मिळवला होता. राजस्थाननं या मॅचमध्ये T20 क्रिकेटमधील नंबर 1 बॉलर तरबेज शम्सीचा समावेश केला आहे. शम्सीची राजस्थान रॉयल्सकडून ही पहिलीच मॅच आहे. यापूर्वी शम्सी 2016 साली आरसीबीकडून 4 मॅच खेळला होता. त्यानं आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू दक्षिण आफ्रिकेचा ऑल राऊंडर ख्रिस मॉरीसची (Chris Morris)  जागा घेतली आहे. मॉरीसला दुखापत झाल्यानं त्याच्या जागी शम्सीचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. मॉरीसला या लिलालावात राजस्थाननं 16 कोटी 25 लाख रुपयांना खरेदी केले होते. तो आजवरच्या आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. CSK च्या 'या' खेळाडूशी धोनीचं दरवर्षी होतं भांडण, माहीनं स्वत: सांगितलं वादाचं कारण जोफ्रा आर्चरच्या अनुपस्थितीमध्ये मॉरीसवर राजस्थानच्या बॉलिंगची मुख्य जबाबदारी होती. मॉरीस पंजाबविरुद्ध महागडा ठरला होता. त्यानं 4 ओव्हरमध्ये 47 रन दिले होते. तसंच त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. मॉरीसनं या आयपीएलमध्ये 8 मॅचमध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत. तसंच 53 रन काढले आहेत. विशेष म्हणजे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध या स्पर्धेच्या पूर्वार्धात झालेल्या मॅचमध्ये मॉरीस राजस्थानचा हिरो ठरला होता. त्यानं 18 बॉलमध्ये 4 सिक्सच्या मदतीनं नाबाद 36 रन काढत विजय राजस्थानला विजय मिळवून दिला होता. RCB vs CSK : मॅच हरल्यानंतर विराटनं धोनीजवळ जाऊन केलं असं काही...VIDEO VIRAL दिल्लीच्या टीममध्ये 3 विदेशी खेळाडू दिल्ली कॅपिटल्सनं देखील या मॅचमध्ये एक बदल केला. पहिल्या मॅचमध्ये जखमी झालेला ऑल राऊंडर मार्कस स्टॉईनिसच्या जागी दिल्लीनं विदेशी खेळाडूची निवड न करता ललित यादवची निवड केली. ललितनं या आयपीएल सिझनच्या पहिल्या टप्प्यात चांगला खेळ केला होता. त्यामुळे अनुभवी स्टिव्ह स्मिथच्या जागी त्याला प्राधान्य देण्यात आलं आहे. दोन्ही टीमच्या Playing 11 दिल्ली कॅपिटल्स : शिखर धवन, पृथ्‍वी शॉ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिमरन हेटमायर, ललित यादव, अक्षर पटेल, आर अश्विन, कगिसो रबाडा, आवेश खानआणि एनरिक नॉर्खिया राजस्थान रॉयल्स :  यशस्‍वी जायसवाल, संजू सैमसन, लियाम लिविंगस्‍टोन, डेव्हिड मिलर, महिपाल लोमरोर रियान पराग, तरबेज शम्सी, राहुल तेवतिया, कार्तिक त्‍यागी, चेतन सकारिया आणि मुस्‍तफिजूर रहमान
  Published by:News18 Desk
  First published: