Home /News /sport /

IPL 2021, DC vs RR Live: राजस्थाननं टॉस जिंकला, पाहा दोन्ही टीमची Playing 11

IPL 2021, DC vs RR Live: राजस्थाननं टॉस जिंकला, पाहा दोन्ही टीमची Playing 11

आयपीएल स्पर्धेत शनिवारी दोन मॅच होणार आहेत. यामधील पहिली मॅच दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (DC vs RR) यांच्यात होत आहे. दोन्ही टीमनं यूएईमधील लीग सुरूवात विजयानं केली आहे.

    अबुधाबी, 25 सप्टेंबर : आयपीएल स्पर्धेत शनिवारी दोन मॅच होणार आहेत. यामधील पहिली मॅच दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (DC vs RR) यांच्यात होत आहे. दोन्ही टीमनं यूएईमधील लीग सुरूवात विजयानं केली आहे. आता या मॅचमध्येही याची पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दिल्ली कॅपिटल्सनं सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 8 विकेटनं मोठा पराभव केला होता. तर कार्तिक त्यागीच्या शेवटच्या ओव्हरच्या जोरावर पंजाब किंग्जवर (PBKS) 2 रननं थरारक विजय मिळवला. आयपीएल पॉईंट टेबलमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) सध्या टॉपवर आहे. तर दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थान विरुद्धची लढत दिल्लीनं जिंकली तर ती 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश करणारी पहिली टीम बनेल. पहिल्या आयपीएल विजेतेपदाची प्रतीक्षा असलेल्या दिल्लीनं आत्तापर्यंत 9 पैकी 7 मॅच जिंकल्या असून त्यांचे 14 पॉईंट्स आहेत. तर राजस्थानची टीम 8 मॅचनंतर 4 विजय आणि 4 पराभवासह पाचव्या क्रमांकावर आहे. या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals)  कॅप्टन संजू सॅमसननं  टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीनं राजस्थान विरुद्धच्या लढतीसाठी एक बदल केला आहे. दिल्लीचा ऑल राऊंडर मार्कस स्टॉईनिसला पहिल्या मॅचमध्ये दुखापत झाली होती. त्याच्या जागी ललित यादवचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. राजस्थानच्या टीममध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. एविन लुईस आणि ख्रिस मॉरीस या दोघांच्या जागी डेव्हिड मिलर आणि तरवेझ शम्सी यांची समावेश करण्यात आला आहे. दोन्ही टीमच्या Playing 11 दिल्ली कॅपिटल्स : शिखर धवन, पृथ्‍वी शॉ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिमरन हेटमायर, ललित यादव, अक्षर पटेल, आर अश्विन, कगिसो रबाडा, आवेश खानआणि एनरिक नॉर्खिया राजस्थान रॉयल्स :  यशस्‍वी जायसवाल, संजू सैमसन, लियाम लिविंगस्‍टोन, डेव्हिड मिलर, महिपाल लोमरोर रियान पराग, तरबेज शम्सी, राहुल तेवतिया, कार्तिक त्‍यागी, चेतन सकारिया आणि मुस्‍तफिजूर रहमान
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi capitals, IPL 2021, Rajasthan Royals

    पुढील बातम्या