मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021, PBKS vs CSK: पंजाबनं टॉस जिंकला, पाहा दोन्ही टीमची Playing 11

IPL 2021, PBKS vs CSK: पंजाबनं टॉस जिंकला, पाहा दोन्ही टीमची Playing 11

आयपीएल स्पर्धेतील लीग मॅचेस (IPL 2021) आता शेवटच्या टप्प्यात आहेत. गुरुवारी डबल हेडर असून यामधील पहिली मॅच पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (PBKS vs CSK) यांच्यात होत आहे.

    दुबई, 7 ऑक्टोबर : आयपीएल स्पर्धेतील लीग मॅचेस (IPL 2021) आता शेवटच्या टप्प्यात आहेत. गुरुवारी डबल हेडर असून यामधील पहिली मॅच पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (PBKS vs CSK) यांच्यात होत आहे. चेन्नईच्या टीमनं यापूर्वीच आयपीएल प्ले ऑफ (IPL 2021 Play off) मध्ये प्रवेश केला आहे. तर पंजाबचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. सीएसकेचा मागील दोन मॅचमध्ये पराभव झालाय. त्यामुळे त्यांचे टॉप 2 मधील स्थान धोक्यात आलं होतं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) बुधवारी पराभव झाल्यानं धोनीच्या टीमला दिलासा मिळालाय. आता शेवटची लीग मॅच जिंकून हे स्थान नक्की करण्याचा चेन्नईचा प्रयत्न असेल. तर पंजाबची टीमही विजयानं लीग मॅचचा शेवट करण्याच्या उद्देशानं मैदानात उतरणार आहे. या मॅचमध्ये पंजाब किंग्जचा (Punjab Kings) कॅप्टन केएल राहुलनं (KL Rahul) टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. पंजाबच्या टीममध्ये एक बदल करण्यात आला असून निकोलस पूरनच्या जागी ख्रिस जॉर्डनचा समावेश करण्यात आला आहे. तर चेन्नईनं दिल्लीविरुद्ध खेळलेल्या टीममध्य्ये कोणताही बदल केलेला नाही. पंजाब आणि सीएसके या दोन्ही टीमचे ओपनिंग बॅटर चांगले फॉर्मात आहेत. पंजाबकडून केएल राहुल आणि मयांक अग्रवाल तर चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी सर्वाधिक रन काढले आहेत. पंजाबच्या मिडल ऑर्डरनं चांगली कामगिरी न केल्यानं टीमला फटका बसलाय. तर चेन्नईसाठी कॅप्टन धोनीचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. PBKS vs CSK, Dream 11Prediction : 'या' 11 खेळाडूंचा करा तुमच्या टीममध्ये समावेश पंजाब किंग्ज : केएल राहुल (कॅप्टन), मयांक अग्रवाल, एडेन मार्करम, सर्फराज खान, शाहरुख खान, मोईसेस हेन्रिक्स, ख्रिस जॉर्डन, हरप्रीत बरार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई चेन्नई सुपर किंग्स : फाफ ड्यू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायुडू, महेंद्रसिंह धोनी, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि जोश हेजलवूड
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Csk, IPL 2021, Punjab kings

    पुढील बातम्या