मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021, RR vs KKR: राजस्थान-कोलकाता मॅचकडं मुंबईचं लक्ष, सॅमसनची टीम ठरवणार Playoff चं भवितव्य

IPL 2021, RR vs KKR: राजस्थान-कोलकाता मॅचकडं मुंबईचं लक्ष, सॅमसनची टीम ठरवणार Playoff चं भवितव्य

आयपीएलमध्ये आज (गुरुवारी) रात्री होणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals) लढतीकडं मुंबई इंडियन्सचं (Mumbai Indians) सर्वात जास्त लक्ष आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 7 ऑक्टोबर : आयपीएलमध्ये आज (गुरुवारी) रात्री होणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स  (Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals) लढतीकडं मुंबई इंडियन्सचं (Mumbai Indians) सर्वात जास्त लक्ष आहे. राजस्थानचा पराभव केल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या (MI) प्ले ऑफच्या आशा वाढल्या आहेत. मुंबईच्या या मार्गात सर्वात मोठा अडथळा हा केकेआरचा (KKR) आहे. कसा आहे पॉईंट टेबल? दिल्ली कॅपिटल्स (DC), चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) या टीमनं यापूर्वीच प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. तर चौथ्या क्रमांकासाठी कोलकाता नाईट रायडर्सचं (KKR) मुंबई इंडियन्ससमोर आव्हान आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या मॅचपूर्वी 7 व्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सनं आता पॉईंट टेबलमध्ये (IPL 2021 Points Table) पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. 13 मॅचनंतर 6 विजय आणि 7 पराजयासह मुंबई इंडियन्सचे 12 पॉईंट्स आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचेही 13 मॅचनंतर 12  पॉईंट्सच आहेत. मात्र केकेआरचा रनरेट (+0.29) हा मुंबई इंडियन्सच्या रनरेटपेक्षा (-0.04) पेक्षा जास्त आहे. त्यामुळे केकेआरची टीम सध्या चौथ्या क्रमांकावर असून त्यांना टॉप 4 मध्ये जाण्याची अधिक संधी आहे. POINTS TABLE: KKR नं मॅच जिंकली तर... केकेआरनं राजस्थानचा पराभव केला तर त्यांचा प्ले ऑफ मधील प्रवेश जवळपास नक्की होईल. केकेआरनं मॅच जिंकल्यानंतरही मुंबई इंडियन्सला प्ले ऑफ मध्ये प्रवेश करायचा आहे तर त्यांना हैदराबादला जवळपास 70 रननं पराभूत करावे लागेल, किंवा 10 ओव्हर्सच्या आता हैदराबादनं दिलेलं लक्ष्य पूर्ण करावे लागेल. कोलकातानं मोठा विजय मिळवला तर मुंबईची वाटचाल आणखी बिकट होईल. IPL 2021 Playoff: मुंबई इंडियन्सच्या आशा वाढल्या, 'या' पद्धतीनं मिळेल टॉप 4 मध्ये प्रवेश राजस्थानकडे किल्ली राजस्थाननं कोलकाताचा पराभव केला तर मुंबई इंडियन्सचं काम सोपं होईल. त्या परिस्थितीमध्ये मुंबईला केवळ हैदराबादचा पराभव करावा लागेल. त्यावेळी नेट रनरेटचा काही प्रश्न येणार नाही. इतकंच नाही तर राजस्थाननं ही मॅच मोठ्या फरकानं जिंकली तर पंजाबच्या आशाही वाढतील. पण त्यासाठी पंजाबनं चेन्नई सुपर किंग्सचा मोठा पराभव करावा लागेल. तसंच मुंबई इंडियन्सचाही मोठा पराभव व्हावा अशी प्रार्थना करावी लागेल. IPL 2021: मुंबई इंडियन्समधून 'या' दिग्गजाचा पत्ता कट, रोहित शर्मा देणार नाही संधी! याचा अर्थ आता 'प्ले ऑफ' मधील चौथ्या टीमचा दरवाजा उघडण्याची किल्ली ही संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सकडं आहे. राजस्थाननं केकेआरचा पराभव केला तर ही चुरस शुक्रवारपर्यंत कायम राहील. पण कोलकाता जिंकलं तर पंजाबचं आव्हान संपुष्टात येईल आणि मुंबईची वाटचाल देखील खडतर होणार आहे.
First published:

Tags: IPL 2021, KKR, Mumbai Indians

पुढील बातम्या