• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • PBKS vs CSK, Dream 11Prediction : 'या' 11 खेळाडूंचा करा तुमच्या टीममध्ये समावेश

PBKS vs CSK, Dream 11Prediction : 'या' 11 खेळाडूंचा करा तुमच्या टीममध्ये समावेश

आयपीएल स्पर्धेत आज (गुरुवार) डबल हेडरचा दिवस आहे. यामधील पहिली मॅच चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात होणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 7 ऑक्टोबर:  आयपीएल स्पर्धेत आज (गुरुवार) डबल हेडरचा दिवस आहे. यामधील पहिली मॅच चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात होणार आहे. महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या सीएसकेचा (CSK) मागील दोन मॅचमध्ये पराभव झाला आहे. तर आरसीबी विरुद्ध झालेल्या पराभवानंतर पंजाबचं या स्पर्धेतील आव्हान हे जवळपास संपुष्टात आलं आहे. आता दोन्ही टीमला मागील मॅचमधील कामगिरी विसरुन खेळ करावा लागेल. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) फॉर्मात आहे. त्याला दक्षिण आफ्रिकेच्या अनुभवी फाफ ड्यू प्लेसिसची उत्तम साथ मिळत आहे. असं असलं तरी अनुभवी सुरेश रैना (Suresh Raina) आणि कॅप्टन महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhioni) खराब फॉर्म हा चेन्नईसाठी काळजीचा विषय आहे. त्यामुळे रविंद्र जडेजाला पुन्हा एकदा त्याची उपयुक्तता सिद्ध करावी लागेल. पंजाबच्या टीमची भिस्त ही कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) आणि त्याचा ओपनिंग पार्टनर मयांक अग्रवालवर आहे. संपूर्ण स्पर्धेत निराशा केलेल्या पंजाबच्या मिडल ऑर्डरला सीएसकेविरुद्ध शेवटची संधी आहे. अनुभवी मोहम्मद शमी बरोबरच अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोईनं हा सिझन गाजवला आहे. पंजाबला मोठा विजय मिळवायचा असेल तर त्यांनी चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. RR vs KKR: राजस्थान-कोलकाता मॅचकडं मुंबईचं लक्ष, सॅमसनची टीम ठरवणार Playoff चं भवितव्य PBKS vs CSK Dream 11 कॅप्टन / विकेट किपर - केएल राहुल व्हाईस कॅप्टन - ऋतुराज गायकवाड बॅटर - मयांक अग्रवाल, फाफ ड्यू प्लेसिस, एडेन मार्करम ऑल राऊंडर्स - ड्वेन ब्राव्हो, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर बॉलर्स - मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, जोश हेजलवूड SCHEDULE TIME TABLE: संभाव्य टीम पंजाब किंग्ज : केएल राहुल (कॅप्टन), मयांक अग्रवाल, निकोलस पूरन, एडेन मार्करम, सर्फराज खान, शाहरुख खान, मोईसेस हेन्रिक्स, हरप्रीत बरार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई चेन्नई सुपर किंग्स : फाफ ड्यू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायुडू, महेंद्रसिंह धोनी, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि जोश हेजलवूड
  Published by:News18 Desk
  First published: