मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: शेवटच्या ओव्हरमध्ये कसं रोखलं डिविलियर्सचं वादळ? भुवनेश्वर कुमारनं केला खुलासा

IPL 2021: शेवटच्या ओव्हरमध्ये कसं रोखलं डिविलियर्सचं वादळ? भुवनेश्वर कुमारनं केला खुलासा

सनरायझर्स हैदराबादनं (SRH) त्यांच्या बॉलर्सच्या दमदार कामगिरीमुळे एका रंगतदार मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 4 रननं पराभव केला. या मॅचमध्ये फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमारनं (Bhuvneshwar Kumar) शेवटच्या ओव्हरमध्ये बंगळुरुला विजयापासून रोखलं.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
मुंबई, 7 ऑक्टोबर : सनरायझर्स हैदराबादनं (SRH) त्यांच्या बॉलर्सच्या दमदार कामगिरीमुळे एका रंगतदार मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (sunrisers hyderabad vs royal challengers bangalore) 4 रननं पराभव केला. या मॅचमध्ये फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमारनं (Bhuvneshwar Kumar last over vs RCB) शेवटच्या ओव्हरमध्ये बंगळुरुला विजयापासून रोखलं. शेवटच्या ओव्हरमध्ये बंगळुरुला विजयासाठी 13 रन हवे होते. त्यांचा प्रमुख बॅट्समन एबी डिविलियर्सनं (AB de Villiers) शेवटचे 4 बॉल खेळूनही आरसीबीला विजय मिळवता आला नाही. क्रिकेट विश्वातील मिस्टर 360 ला रोखण्यासाठी काय योजना बनवली होती, याचा खुलासा मॅचनंतर भुवनेश्वरनं केला आहे. आरसीबीच्या या पराभवामुळे टॉप 2 मध्ये  (IPL 2021 Points Table) जागा मिळवणे त्यांना आणखी अवघड झालं आहे. आरसीबीचे 13 मॅचनंतर 8 विजय आणि 5 पराभवासह 16 पॉईंट्स आहेत. तसंच पॉईंट टेबलमध्ये त्यांची टीम सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. हैदराबादनं या मॅचमध्ये 7 आऊट 141 रन केले होते. त्याला उत्तर देताना आरसबीला 6 विकेट्सच्या मोबदल्यात 137 रन करता आले. भुवनेश्वरनं मॅचनंतर सांगितले की, 'एबी बॅटींग करत असताना मी पूर्ण प्रक्रियेबाबत विचार करत होता. मी वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. एक यॉर्कर मी स्टंपवर टाकाला. त्या बॉलवर एबीनं सिक्स मारला. मी पुन्हा वाईड यॉर्कर टाकला. तुम्ही त्यावरील स्कोअर पाहिला तर तो जास्त नाही. अर्थात आम्ही आमच्या नियोजनापेक्षा 10 ते 15 रन कमी केले,' असं त्यानं मान्य केलं. IPL 2021 : RCB च्या हर्षल पटेलचा पराक्रम, बुमराहला मागे टाकत घडवला इतिहास आरसीबीला शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये 44 रनची आवश्यकता होती. त्यांनी 16 व्या ओव्हरमध्ये 100 रन पूर्ण केले. त्यानंतर राशिद खाननं देवदत्त पडिक्कलला आऊट केलं. त्यानंतर एबी डिविलियर्सनं राशिदच्या बॉलिंगवर एक तर शाहबाज अहमदनं उमरान मलिकच्या ओव्हरमध्ये दोन फोर लगावत आरसीबीच्या अशा जिवंत ठेवल्या होत्या. शेवटच्या दोन ओव्हरमध्ये आरसबीला 18 रनची आवश्यकता होती. त्यावेळी जेसन होल्डरनं शाहबाजला आऊट केले. त्या ओव्हरमध्ये फक्त 5 रन निघाले. POINTS TABLE: भुवनेश्वरच्या शेवटच्या ओव्हरमध्ये आरसीबीला 13 रन हवे होते. पहिल्या तीन बॉलवर फक्त 1 रन निघाला. चौथ्या बॉलवर डिविलियर्सनं सिक्स मारला. पाचवा बॉल पुन्हा निर्धाव गेला. त्यानंतर शेवटच्या बॉलवर फक्त एक रन निघाला. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादनं ही मॅच 4 रननं जिंकली.
First published:

Tags: IPL 2021, RCB, SRH

पुढील बातम्या