मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : ...म्हणून आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव? खेळाडूंची 'ही' चूक कारणीभूत

IPL 2021 : ...म्हणून आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव? खेळाडूंची 'ही' चूक कारणीभूत

आयपीएल स्पर्धेसाठी (IPL 2021) बनवण्यात आलेल्या सुरक्षित बायो-बबलमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानं ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करावी लागली.

आयपीएल स्पर्धेसाठी (IPL 2021) बनवण्यात आलेल्या सुरक्षित बायो-बबलमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानं ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करावी लागली.

आयपीएल स्पर्धेसाठी (IPL 2021) बनवण्यात आलेल्या सुरक्षित बायो-बबलमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानं ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करावी लागली.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 15 मे : आयपीएल स्पर्धेसाठी (IPL 2021) बनवण्यात आलेल्या सुरक्षित बायो-बबलमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानं ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करावी लागली. स्पर्धा स्थगित होऊन 12 दिवस झाले आहेत, तरीही कोरोनाचा प्रभाव कायम आहे. सनरायझर्स हैदराबादचा (SRH)  विकेटकिपर-बॅट्समन वृद्धीमान साहा (Wriddhiman Saha) याचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) फास्ट बॉलर प्रसिद्ध कृष्णा घरी क्वारंटाईन आहे. तर चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) बॅटींग कोच मायकल हसी एक दिवसांपूर्वीच कोरोनामधून बाहेर पडलाय.

आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव का झाला? याबाबतची एक शक्यता आता समोर आली आहे.  'टाईम्स ऑफ इंडिया' मधील वृत्तानुसार आयपीएल स्पर्धेपूर्वी अनेक खेळाडूंनी कोरोना लसीचा डोस घेण्यासाठी (corona vaccine) घेण्यास नकार दिला होता. या खेळाडूंना फ्रँचायझींनी अनौपचारिक प्रस्ताव सादर केला होता. त्यावेळी त्यांनी तो प्रस्ताव नाकारला. 'खेळाडूंना बायो-बबलमध्ये सुरक्षित वाटत होते. त्यामुळे त्यांना लस घेण्याची गरज वाटली नाही. आयपीएल फ्रँचायझींनी देखील यावर नंतर जोर दिला नाही. त्यानंतर सर्व गोष्टी अचानक नियंत्रणाच्या बाहेर गेल्या.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'विदेशी खेळाडू विशेषत: सपोर्ट स्टाफची लस घेण्याची तयारी होती, पण कायदेशीर अडचणींमुळे त्यांना लस देण्यात आली नाही. कोरोना महामारीचा धोका वाढलेला असतानाच खेळाडू दिल्लीत गेले. त्यावेळी त्यांना एका चार्टर्ड विमानानं पाठवण्यात आलं. पण त्या टर्मिनलमध्ये सीआयएसएफ आणि एअरलाईन्सचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात होते. त्यांच्यामध्ये कुणी कोरोनाग्रस्त आहे का? याची कोणतीही माहिती नव्हती.'

टीम इंडियाची चिंता कायम

वृद्धीमान साहा आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा कोरोना रिपोर्ट अजूनही निगेटीव्ह आलेला नाही. या दोन्ही खेळाडूंची इंग्लंड दौऱ्यासाठी झाल्यानं टीम इंडियाची चिंता वाढली आहे. त्यांना 25 मे रोजी मुंबईत रिपोर्ट करायचे आहे. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांचे तीन कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येणं बंधनकारक आहे.

Ball tampering scandal: स्मिथ-वॉर्नरच्या मोहऱ्यानं 3 वर्षांनी सांगितलं सत्य!

चेन्नई सुपर किंग्सचा बॅटींग कोच मायकल हसीचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानं बीसीसीआयला दिलासा मिळाला आहे. हसीला सध्या इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंप्रमाणे मालदीवमध्ये विलगीकरणात राहण्याची गरज नाही. मालदीवमध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सध्या विलगीकरणात आहेत. 16 मे पासून ऑस्ट्रेलियाला थेट जाणारी विमानं सुरु होणार असल्यानं चेन्नईत अडकलेल्या हसीला दिलासा मिळाला आहे.

First published:

Tags: Coronavirus, Cricket, IPL 2021