Home /News /sport /

KKR vs DC, Dream 11 Team Prediction: 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य

KKR vs DC, Dream 11 Team Prediction: 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य

आयपीएलचं पहिलं विजेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) लढत दुसऱ्या क्वालिफायरमध्ये (IPL 2021 Qualifier 2) चांगल्या फॉर्मात असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सशी (Kolkata Knight Riders) होणार आहे.

    मुंबई, 13 ऑक्टोबर: आयपीएलचं पहिलं विजेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) लढत दुसऱ्या क्वालिफायरमध्ये (IPL 2021 Qualifier 2) चांगल्या फॉर्मात असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सशी (Kolkata Knight Riders) होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सची टीम पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत झाली होती. तर कोलकातानं आरसीबीचा पराभव करत क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे. या मॅचमध्ये पराभूत झालेल्या टीमचं या सिझनमधील आव्हान संपुष्टात येणार आहे. तर, विजेती टीम फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध खेळेल. दिल्ली कॅपिटल्सनं सर्वाधिक 10 विजय मिळवून पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. पण फॉर्मातील केकेआरचं त्यांना तगडं आव्हान आहे. विशेषत: केकेआरच्या स्पिन बॉलर्ससमोर दिल्लीच्या बॅटर्सची परीक्षा होणार आहे. केकेआरनं 2012 आणि 2014 साली आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे. तर 2019 पासून प्रत्येक सिझनमध्ये आयपीएल प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारी दिल्ली ही एकमेव टीम आहे. KKR vs DC: चेन्नई विरुद्धच्या पराभवानंतर पंतची डोकेदुखी वाढली, दिग्गज खेळाडूला करणार बाहेर? KKR vs DC Dream 11 कॅप्टन/विकेटकिपर - ऋषभ पंत व्हाईस कॅप्टन - व्यंकटेश अय्यर बॅटर - पृथ्वी शॉ, शिखर धवन, शुभमन गिल ऑल राऊंडर्स - सुनील नरीन, अक्षर पटेल बॉलर्स - लॉकी फर्ग्यूसन, एनरिक नॉर्खिया, आवेश खान, वरुण चक्रवर्ती आयपीएलच्या शेवटच्या टप्प्यात KKR अडचणीत, 'लकी' खेळाडू होणार Out!संभाव्य टीम कोलकाता नाईट रायडर्स : शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितिश राणा, दिनेश कार्तिक, इयन मॉर्गन (कॅप्टन), शाकीब अल हसन, सुनील नरीन, लॉकी फर्ग्युसन, शिवम मावी आणि वरुण चक्रवर्ती दिल्ली कॅपिटल्स : शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कॅप्टन), शिमरन हेटमायर, अक्षर पटेल, टॉम करन, आर. अश्विन, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया आणि आवेश खान
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi capitals, IPL 2021, KKR

    पुढील बातम्या