मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021, Eliminator : हर्षल पटेलच्या निशाण्यावर सर्वात मोठा रेकॉर्ड, KKR विरुद्ध रचणार इतिहास

IPL 2021, Eliminator : हर्षल पटेलच्या निशाण्यावर सर्वात मोठा रेकॉर्ड, KKR विरुद्ध रचणार इतिहास

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) या दोन्ही टीमसाठी या आयपीएलमधील सर्वात महत्त्वाची लढत होणार आहे. या मॅचमध्ये हर्षल पटेलला (Harshal Patel) इतिहास रचण्याची संधी आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 11 ऑक्टोबर: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) या दोन्ही टीमसाठी या आयपीएलमधील सर्वात महत्त्वाची लढत आज (सोमवारी) होणार आहे. या दोन्ही टीममध्ये शारजाह क्रिकेट ग्राऊंडमध्ये (Sharjah Cricket Ground) एलिमेनेटरची लढत होणार आहे. या लढतीत पराभूत झालेल्या टीमचं आव्हान आयपीएलमधून संपुष्टात येणार आहे. त्यामुळे दोन्ही टीमना ही मॅच जिंकणे आवश्यक आहे.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या मॅचमध्ये आरसीबीचा कॅप्टन  विराट कोहलीची (Virat Kohli) भिस्त हर्षल पटेलवर (Harshal Patel) आहे. हर्षल या आयपीएल सिझमध्ये (IPL 2021) चांगल्या फॉर्मात आहे. त्यानं आत्तापर्यंत 8.40 च्या इकोनॉमी रेटनं 30 विकेट्स घेतल्या आहेत.  आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय होण्याचा पराक्रम हर्षल पटेलने केला आहे. याआधी जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) 2020 साली 27 विकेट घेतल्या होत्या, तर भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) 2017 साली 26 विकेट मिळाल्या होत्या.

आयपीएल इतिहासात आरसीबीकडून एखाद्या बॉलरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी लेग स्पिनर युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) 2015 साली आरसीबीकडून खेळताना 23 विकेट घेतल्या होत्या.आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक 32 विकेट घेण्याचा विक्रम चेन्नईच्या (CSK) ड्वॅन ब्राव्होच्या (Dwayne Bravo) नावावर आहे. 2013 साली ब्राव्होने हा विक्रम केला होता. दिल्लीच्या कागिसो रबाडाने 2020 साली 30 विकेट घेतल्या होत्या.

IPL 2021, Eliminator: 'करो वा मरो' लढतीत RCB मध्ये होणार बदल, अशी असेल Playing 11

हर्षल पटेलनं आता रबाडाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. त्याला ब्राव्होचा रेकॉर्ड मोडण्यासाठी आणखी 3  विकेट्सची गरज आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध त्यानं या विकेट्स घेतल्यात आयपीएल इतिहासातील एका सिझनमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा बॉलर म्हणून त्याची नोंद होईल.

IPL 2021, DC vs CSK: धोनीची फटकेबाजी पाहून साक्षीला अश्रू अनावर! पाहा VIDEO

विराटनं दुसऱ्यांदा दिली संधी

हर्षल पटेलनं 2012 साली आरसीबीकडूनच आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तो 2017 पर्यंत  आरसीबीचा सदस्य होता. या काळात त्यानं 36 मॅचमध्ये 34 विकेट्स घेतल्या. त्याला 2018 साली आरसबीनं रिलीज केलं. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) तो खेळला. दिल्लीकडून त्याला तीन सिझनमध्ये फक्त 12 मॅच खेळण्याची संधी मिळाली. आयपीएलचा हा सिझन सुरू होण्यापूर्वी त्याच्यावर विराटनं पुन्हा विश्वास दाखवला आणि  दिल्लीकडून खरेदी केले. विराटचा हा विश्वास हर्षल पटेलनं सार्थ ठरवला आहे.

First published:

Tags: IPL 2021, KKR, RCB