• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • IPL 2021: Gayleच्या क्रिकेट पदार्पणावेळी जन्मलाही नव्हता हा खेळाडू, Universal Bossला झिरोवर बाद करून बनला हिरो

IPL 2021: Gayleच्या क्रिकेट पदार्पणावेळी जन्मलाही नव्हता हा खेळाडू, Universal Bossला झिरोवर बाद करून बनला हिरो

IPL 2021: पॉवर प्लेमध्ये 22 वर्षांचा फास्ट बॉलर शिवम मावीने (Shivam Mavi) कसदार बॉलिंग केली इतकंच नाही तर शिवमने पंजाबचा जबरदस्त बॅट्समन ख्रिस गेलची (Chris Gayle) विकेट घेतली.

  • Share this:
नवी दिल्ली, 27 एप्रिल: अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या मालकीची आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) या वर्षीच्या आयपीएल टी-20 (IPL 2021) क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी करता आलेली नाही. आयपीएल 2021 सीझनमध्ये आतापर्यंत झालेल्या 5 पैकी 4 मॅचेसमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पण सोमवारी झालेल्या पंजाब किंग्जविरुद्धच्या मॅचमध्ये कोलकात्याने (PBKS vs KKR) चांगली कामगिरी केली. त्यांनी पंजाबला चांगली सुरुवात करण्यापासून रोखलं. पॉवर प्लेमध्ये 22 वर्षांचा फास्ट बॉलर शिवम मावीने (Shivam Mavi) कसदार बॉलिंग केली इतकंच नाही तर शिवमने पंजाबचा जबरदस्त बॅट्समन ख्रिस गेलची (Chris Gayle) विकेट घेतली. शिवमने 4 ओव्हरमध्ये 13 रन देत 1 विकेट घेतली. त्याने 4 पैकी 3 ओव्हर पॉवर प्लेमध्ये टाकल्या. शिवम आणि गेलविषयी रंजक बाब म्हणजे शिवमचा जन्म 26 नोव्हेंबर 1998 ला झाला, त्याच्यासमोर बॅटिंग करणाऱ्या 41 वर्षांच्या ख्रिस गेलने ऑक्टोबर 1998 मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. म्हणजेच काय जेव्हा शिवमचा जन्मही नव्हता झाला तेव्हापासून गेल क्रिकेट खेळत आहे. क्रिकेट आणि आयपीएलमधील सर्वांत महत्त्वाची गोष्ट हीच आहे की परदेशी अनुभवी खेळाडूंसोबत खेळण्याची संधी भारतीय तसंच परदेशी तरुण खेळाडूंना मिळते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि अनुभव दोन्हीही वृद्धिंगत होतो.या आधी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (Rajasthan Royals) मॅचमध्ये शिवमने 4 ओव्हरमध्ये 19 रन देत 1 विकेट घेतली होती. (हे वाचा-IPL 2021 मधून मोठी बातमी! वॉर्नर-स्मिथसह 30 ऑस्ट्रेलियन्स परतणार मायदेशी-रिपोर्ट) अंडर-19 वर्ल्ड कपनंतर निर्माण केली ओळख भारतीय अंडर-19 क्रिकेट टीमने 2018 चा वर्ल्ड कप जिंकला होता. त्या टीममध्ये शिवम मावी होता. वर्ल्ड कपमधल्या कामगिरीमुळे त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 2018 आयपीएल लिलावानंतर दोन वेळा कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायजीने त्याला आपल्या टीममधून खेळण्याची संधी दिली. 14 एप्रिल 2018 ला शिवमने पहिली आयपीएल मॅच सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) खेळली होती. त्यात शिवमने एका ओव्हरमध्ये 10 रन दिले होते. (हे वाचा-IPL 2021 : यंदाच्या आयपीएलमधला सगळ्यात भारी कॅच, मिस करू नका, पाहा VIDEO) 21 टी-20 मॅचमध्ये घेतल्यात 15 विकेट्स शिवम मावीने टी-20 करिअरमध्ये 21 मॅचमध्ये 15 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 9 च्या जवळपास आहे. त्याने 6 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 25 आणि 22 अ दर्जाच्या मॅचमध्ये 30 विकेट्स घेतल्या आहेत. सोमवारच्या सामन्यात ख्रिस गेलसारख्या खेळाडूला बाद केल्यामुळे नक्कीच शिवमचा आत्मविश्वास दुणावला असेल. अजूनही तो चांगली कामगिरी करू शकेल.
First published: