• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: CSK विरुद्धच्या पराभवानंतर मॉर्गनसाठी आणखी एक डोकेदुखी, पुढील मॅचमध्ये घ्यावी लागणार काळजी

IPL 2021: CSK विरुद्धच्या पराभवानंतर मॉर्गनसाठी आणखी एक डोकेदुखी, पुढील मॅचमध्ये घ्यावी लागणार काळजी

कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) कॅप्टन इयन मॉर्गन (Eoin Morgan) याच्यासाठी हा आयपीएल सिझन आतापर्यंत खराब गेला आहे. आता या पुढील स्पर्धेत मॉर्गनला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 एप्रिल: कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) कॅप्टन इयन मॉर्गन (Eoin Morgan) याच्यासाठी हा आयपीएल सिझन आतापर्यंत खराब गेला आहे. मॉर्गन बॅट्समन म्हणून अपयशी ठरलाय. केकेआरचा सलग तीन मॅचमध्ये पराभव झाला आहे. त्याचबरोबर आता त्याला 12 लाखांचा दंड बसला आहे. चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध बुधवारी झालेल्या मॅचमध्ये कोलकाताच्या बॉलर्सनी संथ गतीनं बॉलिंग केल्यानं (Slow over rate) मॉर्गनला 12 लाखांचा दंड झाला आहे. कोलकाताची या सिझनमधील ही पहिलीच चूक आहे, त्यामुळे फक्त मॉर्गनवर दंडात्मक कारवाई केली आहे. पण आता या पुढील स्पर्धेत मॉर्गनला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. नियम काय सांगतो? आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या नियमानुसार  प्रत्येक टीमला 90 मिनिटांत 20 ओव्हर पूर्ण करणं अपेक्षित आहे. यापूर्वी 90 व्या मिनिटाला 20 वी ओव्हर सुरू करावी असा नियम होता, परंतु आता निर्धारित दीड तासाच्या आत 20 ओव्हर पूर्ण करावं लागणार आहे. शिवाय या 90 मिनिटांत संघाला अडीच मिनिटांचा दोनदा टाइम आऊटही मिळणार आहे. म्हणजेच प्रत्येक संघांला 85 मिनिटांत एकूण 20 ओव्हर टाकणं अपेक्षित आहे. त्यानुसार प्रत्येक संघाला एका तासामध्ये 14.1 ओव्हर  टाकावी लागतील. 8 दिवसांमध्ये 3 जणांवर ICC ची कारवाई, आता 'या' देशातील खेळाडूवर बंदी आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, पहिल्यांदा नियमांचं उल्लंघन केल्यास 12 लाख रुपयांचा दंड आणि पुढील दोन सामन्यांमध्ये पुन्हा तीच चूक केली तर कर्णधाराला कडक शिक्षेचा सामना करावा लागू शकतो. पहिल्यांदा ही चूक झाली तर कॅप्टनला 12 लाखांचा दंड, दुसऱ्यांदा चूक झाली तर कॅप्टनला 24 लाखांचा दंड तिसऱ्या चुकीसाठी कॅप्टनवर एका मॅचची बंदी असा नियम आहे. तर दुसऱ्यांदा या चुकीनंतर टीममधील खेळाडूंना 6 लाख रुपये किंवा मॅच फिसमधील 25 टक्के रक्कम (यापैकी जे कमी असेल ते) दंड, तिसऱ्या चुकीनंतर टीममधील खेळाडूंना 12 लाख रुपये किंवा मॅच फिसमधील 50 टक्के रक्कम (यापैकी जी रक्कम कमी असेल ती) दंड म्हणून द्यावी लागेल. या आयपीएल स्पर्धेत अशा प्रकारची कारवाई झालेला मॉर्गन हा तिसरा कॅप्टन आहे. यापूर्वी  चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि मुंबई इंडियन्सचा कॅप्टन (Rohit Sharma) यांच्यावर ही कारवाई झाली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: