Home /News /sport /

IPL 2021: मॉर्गनची चालाखी पुन्हा उघड, मुंबईला हरवण्यासाठी घेतली 'कोड वर्ड'ची मदत VIDEO

IPL 2021: मॉर्गनची चालाखी पुन्हा उघड, मुंबईला हरवण्यासाठी घेतली 'कोड वर्ड'ची मदत VIDEO

मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पराभूत करण्यासाठी कोलकाताचा कॅप्टन इयन मॉर्गननं (Eoin Morgan) केलेली चालाखी उघड झाली आहे.

    मुंबई, 26 ऑगस्ट:  कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) आयपीएल स्पर्धेच्या सेकंड हाफमध्ये (IPL 2021, Phase 2) आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. कोलकातानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभव करत 'प्ले ऑफ'ची आशा जिवंत ठेवली आहे. मात्र यामध्ये मुंबई इंडियन्सला पराभूत करण्यासाठी कोलकाताचा कॅप्टन इयन मॉर्गननं (Eoin Morgan) केलेली चालाखी उघड झाली आहे. मुंबई इंडियन्सच्या मॅचमध्ये मॉर्गन 'कोड वर्ड'च्या माध्यमातून ड्रेसिंग रुमची मदत घेत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबईची रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक ही जोडी मैदानात असताना मॉर्गनला ड्रेसिंग रुममधून केकेआरचे एनलिस्ट नॅथन लीमन (Nathan Leamon) यांनी 'कोड वर्ड'च्या माध्यमातून गुप्त संदेश दिला. लीमननं एका प्ले कार्डच्या मदतीनं मॉर्गनला हा संदेश दिला. यावर एक आकडा मोठ्या फॉन्टमध्ये लिहिला होता. हा फॉन्ट इतका मोठा होता की तो लांबूनही स्पष्ट दिसत होता. लीमन यांनी या माध्यमातून मॉर्गनला गुप्त संदेश पाठवल्याचं मानलं जात आहे. यापूर्वीही केला होता प्रकार मॉर्गनला कोड वर्डच्या माध्यमातून संदेश पाठवणारे नॅथन लीमन हे इंग्लंड क्रिकेट टीमचे एनलिस्ट आहेत. ते मॉर्गनचे अतिशय विश्वासू मानले जातात. त्याच्याच सांगण्यावरुन लीमन यांचा केकेआरच्या टीममध्ये समावेश झाला आहे. यापूर्वी 2020 साली दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या सीरिजमध्येही लीमन यांनी कोड वर्डच्या माध्यमातून मॉर्गनला संदेश पाठवला होता. त्यावेळी मॉर्गनवर टीकाही झाली. IPL 2021: मुंबईवरील विजयानंतर कोलकाताच्या कॅप्टनला झाली मोठी शिक्षा, शाहरुखची टीम संकटात या आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या हाफमध्येही मॉर्गन-लीमन जोडीनं हाच प्रकार केला होता. त्यावर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं टीका केली होती. डगआऊटमधून या प्रकारची मदत मिळणार असेल तर कुणीही कॅप्टन होऊ शकतं, असं मत तेव्हा सेहवागनं व्यक्त केला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, KKR, Mumbai Indians

    पुढील बातम्या